बोठेने फोन केलेल्या 'त्या 'वकिलांना 'नोटीस'
वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधीत दोन वकिलांना पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली.
दरम्यान करागृहात मोबाईल आढळून आल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत ११ आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांना गुन्ह्यात सहआरोपी करून घेण्यात आले आहेत. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे सध्या पारनेर उपकारागृहात आहे. मागील महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, निरीक्षक बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. यावेळी कारागृहातील आरोपींकडे दोन मोबाईल आढळून आले होते. या मोबाईलचा वापर बोठे याने केल्याचे पोलीस तपासात समोर आले.
त्याने दोन वकिलांना तीन ते चार वेळा कॉल केले आहेत. या कॉलमधून काय संंभाषण झाले, कॉल करण्यामागील उद्देश काय होता. याचा सर्व तपास पोलीस करत आहे. यासाठी संबंधीत वकिलांचे जबाब पोलीस नोंदविणार आहे. त्यांना नोटीसा पाठविण्यात आल्या असून अजून ते जबाब देण्यासाठी हजर झाले नसल्याचे निरीक्षक बळप यांनी सांगितले.
0 Comments