अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग : मराठी भाषेचा उगम

अहमदनगर  जिल्ह्याचे  अंतरंग : 
मराठी भाषेचा उगम 

अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुळा व प्रवरा नद्यांचे  उगमस्थान आहे.  आणि शेजारील नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदी उगम पावते व कोपरगाव तालुक्यामध्ये गोदावरी नदी अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते.  पुढे पुणतांबा या गावावरून काळेगाव ,टोके याठिकाणी या तीनही नद्यांचा एकमेकांशी संगम होतो या ठिकाणाला प्रवरासंगम असे म्हणतात.  या नद्यांमुळे अहमदनगर जिल्हा सुजलाम सुफलाम झाला आहे . 

या नद्यांच्या उगमा प्रमाणे मराठी भाषेचा उगम अहमदनगर जिल्ह्यामध्ये झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही . त्यासाठी आपल्याला पौराणिक काळामध्ये जावे लागेल असे नारायण आव्हाड यांनी सांगितले.  अहमदनगर संग्रहालय येथील लायब्ररीचे काम पाहत असताना वि.  का.  राजवाडे यांनी संपादन केलेली ज्ञानेश्वरीची प्रत मिळाली.  त्यामध्ये सविस्तर वर्णन केले आहे की शके १८३१ मधील ही  'ज्ञानेश्वरी' आहे व धुळे येथील आत्माराम छापखान्यात   छापलेली आहे. 

पूर्वी पौराणिक काळामध्ये साधारण शक पूर्व १५०० मध्ये अहमदनगर, नाशिक, बीड, पंढरपूर या परिसराला दंडकारण्य म्हणून संबोधले जात होते.  मराठी भाषेचा जन्मसाल नक्की ठरवण्याता येण्यासारखा आहे.  आर्यांची वसाहत केव्हा झाली.  इतर भाषेपेक्षा महाराष्ट्री भाषा  संबंधाने जास्त खुलासेवार माहिती मिळण्याची शक्यता आहे.  आर्य  समाज पश्चिमेकडून कोकणात उतरले व तेथून घाटाने दंडकारण्यात आले हा काळ साधारणत १००० ते १५०० असा येतो.  दंडकारण्य  म्हणजे डोंगरांचा उतरता लांब पट्टा असा आहे.  कोकणातील भाषेवर या उतरण्याचा परिणाम झाला आहे.  कऱ्हाड  कडून कृष्णेच्या खोर्याीतून नाशिकमधून गोदावरी खोऱ्यामधून, विदर्भातून वैंनगंगेच्या खोऱ्यात आर्यांचा दंडकारण्यात कायमच्या भरभराटीच्या वसाहती होत्या . दंडकारण्यात आर्य लोकांच्या वसाहती त्यांच्या  प्रांतांचा व स्थळांचा उल्लेख मगध देशाच्या आर्यावर्ती   राजा अशोक मौर्य त्याच्या शीला शासनात झाला आहे (शक पूर्व ३५० वर्ष ) यानंतर 'वररुचि' नामक प्राकृत व्याकरणकर्त्याने  महाराष्ट्र भाषेचे व्याकरण लिहून तिच्या नावाचा उल्लेखही केला आहे . अर्थात महाराष्ट्र देश त्याला माहित होता हे उघड आहे शकपूर्व 300 वररुची याने आपल्या प्राकृत व्याकरणात मराठी भाषेचा उल्लेख केला आहे.  अशोकाने देखील रस्टिक  किंवा रटक असा उल्लेख केलेला आढळतो.  येणेप्रमाणे काळा  पासून शकपूर्व ३०० वर्षांपूर्वी  मराठी भाषेचा उल्लेख सापडतो . व्याकरण रचना योग्य होण्यासाठी कमीत कमी दोन -चार  शतकांचा अवधी लागतो म्हणजे शकपूर्व ७०० च्या सुमारास किंवा बुद्धाच्या वेळेपर्यंत आपण आलो त्यावेळेस महाराष्ट्री भाषेचा प्रारंभ झालेला असावा. 

 कात्यायनाचा पराभव सिमुख  सातवाहनाने केला.(शकपूर्व १५०) कालांतराने शकांनी  आपल्या राज्याचा विस्तार माळवा पर्यंत नेऊन सर्व आर्यावर्त शकमय करण्याचा घाट घातला.  सुमारे पन्नास वर्षे त्यांच्या चिकाटीचा काळ  गेला तर सातवाहन राजाने शकांचा पूर्ण पराभव केला.  शकांचा पराभव करण्यासाठी पराक्रमी वीर राजांचा गाथा सप्तशतीचा उल्लेख आला आहे महाराष्ट्री  भाषा "सवाहन सुहरतो सिदान देन्ते तूह करे  लक्खम! चलणेंन विक्कामाइत्तचरी   ओम अणुसिक्की अ  तिस्सा !! गाथा सप्तशती १५ शतक ५  गाथा सप्तशती उर्फ ७००गाथाचा संग्रह 'हाल' सातवाहनाने केला असे सप्तशतीच्या पहिल्या शतकाच्या तिसऱ्या गाथेत 'हाल' स्वतः लिहिले आहे.  अर्थात 'हाल' सातवाहनाच्या पूर्वी झालेले हे विक्रमादित्य व सातवाहन नरेंद्र असले पाहिजे असे वाटते . 

लेखक :नारायण आव्हाड

९२७३८५८४५७ 

संदर्भ  : ज्ञानेश्वरी १८३१

 पान नंबर २० ते ४५

Post a Comment

0 Comments