लसीकरण केंद्रातील सावळा गोंधळ
सिव्हील हॉस्पिटल |
सावित्रीबाई फुले संकुल |
आलेल्या डोसची संख्या आणि देण्यात आलेल्या डोसच्या संख्येत तफावत
वेब टीम नगर : आज शहरातल्या लसीकरण केंद्रांवर कोवॅक्सीन लस घेतलेल्या व्यक्तींना लसीकरणातला दुसरा डोस देण्यात आला.त्यासाठी नागरिकांनी पहाटे पासूनच लसीकरण केंद्रांवर गर्दी केली होती.या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींचा डोस आणि त्याच्या १० पट लस घेण्यासाठी आलेले नागरिक असे प्रमाण होते त्यामुळे केंद्रावर जमलेल्या बहुसंख्य लोकांना पहाटे पासून रांगेत उभं राहूनही लस मिळू न शकल्याने रिकाम्या हातानेच परतावे लागले.मात्र चौकशीअंती उपलब्ध झालेली लस आणि नागरिकांना दिलेली लस याच्या संख्येत प्रचंड तफावत दिसून आली. तर उरलेल्या डोस चे क्काय झाले हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहे.
लसीकरण केंद्रचालकांनी जिजामाता उद्यान येथे लसीचे ४० डोस आल्याचे सांगत ५ डोस शासकीय कर्मचाऱ्यांसाठी राखीव असल्याने ३५ टोकन चे वाटप केले तर माळीवाड्यातील लसीकरण केंद्रावर याच पद्धतीने ४० डोस आल्याचे सांगितले. तोफखाना येथील केंद्रचालकांनीं ३५ डोस आल्याचे सांगितले तर सावित्रीबाई फुले संकुलातील केंद्रावर ४० डोस उपलब्ध झाल्याची माहिती मिळाली.तर तेथील केंद्र संचालकांनी शेवटच्या क्षणी किती डोस आले होते असे विचारल्यानंतर जितके डोस आले होते तितके दिले असे सांगून तेथून काढता पाय घेतला सिव्हिल हॉस्पिटल मध्ये लस उपलब्ध न झाल्याने लसीकरणच करण्यात आले नाही. तश्या आशयाचा फलकही तेथे लावला होता.
मात्र या सर्व प्रकारची माहिती घेण्या करीता आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ६०० डोस आल्याची माहिती दिली तसेच या सर्व डोस चे वाटप केंद्रांवर केल्याचे सांगितले. मात्र नंतर केंद्र चालकांनी दबक्या स्वरात लसींचे जास्त डोस आल्याचे मान्य केले. मात्र सकाळपासून रांगेत उभ्या राहिलेल्या व ज्यांना कमी डोस आल्याचे सांगितल्याने रिकामे परतावे लागले त्यांना झालेल्या मनस्तापाचे काय असा प्रश्न शिल्लक राहतो.
0 Comments