कोरोना विषाणूंचा देशात विस्फोट
एकाच दिवशी दीड लाखांवर ॲक्टीव्ह रुग्ण
गेल्या २४ तासात ९०,५८४ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. त्या आधी शुक्रवारी देशात एक लाख४५ हजार नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण २५ कोटी६६ लाख २६ हजार चाचण्या झाल्या आहेत. शनिवारी एकाच दिवसात १४ लाख चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत.
देशात एक वेळ अशी होती की कोरोनाच्या रुग्णसंख्येवर नियंत्रण आले होते. पण पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळतंय. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
देशातील कोरोनाची स्थिती
एकूण कोरोना रुग्ण संख्या - एक कोटी ३३ लाख ५८ हजार ८०५
एकूण डिस्चार्ज- एक कोटी २० लाख ८१ हजार ४४३
एकूण अॅक्टिव्ह केस- १० लाख ४६ हजार ६३१
एकूण लसीकरण- १० कोटी १५लाख ९५ हजार १४७ डोस
शनिवारी राज्यात तब्बल५३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ५५४४१ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण २७,४८,१५३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२. १८ % एवढे झाले आहे. शनिवारी राज्यात३०९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यदूर १. ७२ टक्के एवढा आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं पाऊले उचलायला सुरुवात झाली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
0 Comments