खा. सुजय विखेंनी आणली १० हजार रेमडिसीवीरची इंजेक्शन
वेब टीम नगर : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वाढतच आहे . जिल्हयात मागच्या काही दिवसांपासून तीन हजार पेक्षा जास्त बाधितांची नोंद होत आहे . वाढत्या बाधितांच्या संख्यामुळे रेमडिसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असताना खासदार डॉ सुजय विखे यांनी कोणताही गाजावाजा न करता थेट दिल्लीवरुन रेमडिसिव्हर इंजेक्शनचा मोठा कोटा जिल्हयातील नागरिकांसाठी आणला. सुजय विखे यांनी खाजगी विमान करुन १० हजार रेमडिसिव्हर इंजेक्शन अहमदनगरला आणली.
१९ एप्रिल सोमवार रोजी सुजय विखे यांनी हे इंजेक्शनचा साठा आणला त्यानंतर त्यांनी याचा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करुन याबाबतची माहिती दिली. ही इंजेक्शन्स सर्व पक्षातील लोकांसाठी आहेत. कोणी याचे राजकारण करू नये, मी मुद्दाम दोन दिवस लेट हा व्हिडीओ अपलोड केला. नाहीतर माझ्यावर कारवाई झाली असती असं खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
आपल्या या व्हिडिओमध्ये त्यांनी पुढे म्हटले आहे कि माझ्यापरीने जमेल ती मदत अहमदनगर जिल्ह्याला करण्याचा प्रयत्न मी करत आहे. तरुण मुलं आज तडफडत आहेत. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. ज्यांनी मला खासदार केलं, निवडून दिलं, त्या लोकांसाठी मी माझ्या परीने जमेल ती मदत करत आहोत, असं सुजय विखे म्हणाले. हा पैसा कमावण्याचा धंदा नाही. लोकप्रतिनिधी म्हणून हे करणं आमची जबाबदारी आहे आणि त्याचं मला समाधान आहे. लोकांना माझ्या डोळ्यासमोर मरताना पाहू शकत नाही, असं सुजय विखे म्हणाले.
मी गेलो फॅक्टरीत, तिथे मी माझ्या मैत्री संबंधांचा वापर केला, मदत घेतली आणि ही औषधं घेतली. माझ्यावर कारवाई होईल की नाही माहिती नाही. खासगी विमानाने ही औषधं आणतोय. माझ्या मनात पाप नाही, त्यामुळे मी कारवाईला घाबरत नाही, असं सुजय विखेंनी सांगितलं.
0 Comments