कोरोनाचा विस्फोट
वेब टीम नगर : नगर जिल्ह्यात आज कोरोना बाधितांच्या आकड्यांनी विक्रमी संख्या गाठत कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र असून आज ३७९० कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
नगर शहरात व अन्य ठिकाणी बेड्स ची वानवा असून त्यापाठोपाठ रेमडेसिवीर इंजेक्शन , ऑक्सिजन चा तुटवडा सुरूच असल्याने रुग्णांच्या नाते वाइकांची बेड साठी , ऑक्सिजन साठी , आणि इंजेक्शन साठी तर खाई ठिकाणी प्लाझ्मा साठी सुद्धा धावपळ होतांना दिसत आहे. तर नगरच्या अमरधाम मध्ये पाय ठेवायलाहि जागा नाही. इतकी प्रेतं जळतानाचे विदारक चित्र पाहायला मिळते. या सर्व पार्श्वभूमीवर आजचा बाधितांचा आकडा चिंताजनकच आहे.
अहमदनगर शहरात - ८८७, तर राहता - ३०२,संगमनेर - २१७, श्रीरामपूर - २०० , नेवासे -१२०, नगर तालुका -३४२,पाथर्डी-१०७,अकोले - २३३,कोपरगाव - १४६, कर्जत - २९३, पारनेर - १५६, राहुरी - २१६, भिंगार शहर - १६६ , शेवगाव - १२१,जामखेड - ५५, श्रीगोंदे - १०९, मिलिट्री हॉस्पिटल - ९, इतर जिल्ह्यातील - १०८, इतर राज्यातील - ०३ अशी आजची आकडेवारी आहे. काल बऱ्या झालेल्या ३०६५ रुग्णांची आज घरी रवानगी करण्यात आली.
0 Comments