माजी खासदार यशवंतराव गडाख यांची प्रकृती नाजूक
गडाख याच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांना ७ एप्रिलला कोरोनाची लागण झाली होती. कुटुंबातील इतर सदस्य यातून सहिसलामत बाहेर आले मात्र गडाख यांचे वय व काही जुन्या व्याधींमुळे त्यांना त्रास जाणवू लागल्याने पुण्यातील मंगेशकर हाॅस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांचे पुत्र प्रशांत गडाख यांनी फेसबुकवरुन एक भावूक पोस्ट केली असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून माझे वडील पुण्याला दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कोरोना झाल्यामुळे अॅडमिट आहेत.
त्यांना भेटता येत नाही, भेटण्यास देखील मनाई आहे. ते गंभीर आजारी आहेत . मला तुमच्याकडून सहानभूती नको. साहेब अनेक प्रार्थना स्थळांवर नेहमी सांगत असतात जिथं सायन्स संपत तिथून पुढं अध्यात्म सुरू होत. नेवाश्यात ,नगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलाय.
आपल्याला सगळ्यांनाच आता प्रार्थना मागायची आहे. आपण आपापल्या घरी राहून प्रार्थना करायची प्रार्थनेतनं सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सायन्स आणि अध्यात्म यांच्या मेळातून आपल्याला साहेबांना लवकरच बर करू धन्यवाद ...
0 Comments