आरोग्य आहार : दूध वांगे
साहित्य :
अर्धा लिटर दूध,४ ते ५ छोटी वांगी (पाव किलो),एक चमचा तेल,चिमूट्भर मीठ्,(चिमूटभर साखर, गरम मसाला, दोन ते तीन पाकळ्या लसूण वाटून, दाण्याचे कूट)
कृती:
वांग्याची देठे कापा. देठाच्या पाकळ्या काढू नका. वांग्याला देठाकडून दोन चिरा द्या.
फ्राय पॅन किंवा कढइत दूध ओता. त्यात ही अख्खी वांगी टाका. एक चमचा तेल घाला.
मंद आचेवर वांगी शिजवा. वांगी शिजली की पाहिजे तर थोडे दूध असताना गॅस बंद करा.
सुकी भाजी हवी असल्यास दूध आटू द्या.
गॅसवरून उतरवून भाजीत चिमूट मीठ घाला. कंसातील पदार्थ ऐच्छीक आहेत. ते तुमच्या आवडीप्रमाणे घाला.
गरम भाकरी किंवा पोळी बरोबर न्याहरी करा. दिवसभर समाधान राहील.
0 Comments