आरोग्य आहार : ब्रेड दहीवडा
दही वडा जे सर्वांनाच आवडतो. या साठी उडीद डाळची गरज असते. पण चटकन दही वडा बनवायचा असेल तर आपण ब्रेडचा वापर करून देखील दही वडा बनवू शकता. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य :
४ स्लाइस ब्रेड,३/४ कप दही,कोथिंबिरीची चटणी,हिरव्या मिरच्या,चिंचेची गोड चटणी,१ लहान चमचा साखर, गरजेप्रमाणे जिरेपूड, तिखट, मीठ, आमसूल पूड,किशमिश,कोथिंबीर, २ उकडलेले बटाटे, काळ मीठ.
कृती:
ब्रेडचे कोपरे कापून घ्या.एक बाउल मध्ये बटाटे मॅश करा. या मध्ये हिरव्यामिरच्या, आमसूलपूड, किशमिश, जिरेपूड,मीठ घालून
मिसळून घ्या.दह्यात साखर घालून फेणून घ्या. मिश्रणाचे बॉल बनवा आणि ब्रेडच्यास्लाईसने कव्हर करा.
कढईत तेल तापत ठेवा. ब्रेडचे गोळे तळून घ्या.नंतर या तळलेल्या गोळ्यांवर गोड दही, चिंचेची गोड चटणी,हिरवी चटणी, जिरेपूड,तिखट .काळ मीठ, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
0 Comments