आरोग्य आहार
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बाजरी व मुगाची गोड खिचडी
साहित्य : १/२ कप बाजरी धान्य,१/४ कप मूग डाळ, ३/४ कप गूळ,३ चमचे तूप, ८/१० काजू,आवश्यकतेनुसार हिरवी वेलची, ८/१० मनुका,४ कप पाणी
कृती : मुगाची डाळ भाजून घ्या, एका कढईत मुगाची डाळ नीट भाजून घ्या. आता कुकरच्या भांड्यात एक बाउल बाजरी आणि भाजलेली मुगाची डाळ एकत्र घ्या. यामध्ये पाणी ओतून तीन ते चार शिट्या येईपर्यंत दोन्ही सामग्री शिजवून घ्या.
गुळाचा पाक तयार करा
दुसऱ्या पॅनमध्ये गूळ पावडर घ्या. थोडंसं पाणी मिक्स करून पाक तयार करा.कुकरमध्ये गुळाचा पाक ओता. यानंतर कुकरचं झाकण काढून शिजलेली मुगाची डाळ आणि बाजरी व्यवस्थित मिक्स करा. कुकरमध्ये गुळाचा पाक गाळून मिक्स करावा. वरून एक चमचा तूप देखील सोडावं.यानंतर दुसऱ्या कढईमध्ये दोन चमचे तूप घ्या. तुपामध्ये काजू आणि मनुके तळून घ्या . तळलेले काजू आणि मनुके तयार केलेल्या मिश्रणामध्ये मिक्स करा. यात चिमूटभर वेलची पावडर देखील घालू शकता. तयार आहे चविष्ट गोड खिचडी.
0 Comments