शिवाजी महाराजांविषयी वंजारी समाजाची श्रद्धा

छत्रपती शिवाजीमहाराज जयंती (तिथी प्रमाणे) विशेष लेख 

शिवाजी महाराजांविषयी वंजारी समाजाची श्रद्धा

व्यवसाय व्यापार निमित्ताने भारतामध्ये उत्तर भारत दक्षिण भारत फिरणाऱ्या भटकंती करणारा समाज म्हणून वंजारी समाजाला ओळखतात.  त्यामध्ये हिंदू, मुस्लीम ,शीख  आणि महानुभाव पंथीय अशा विविध विचारप्रणालीत धार्मिक प्रणालीत आज देशातील वंजारी वंजारी समाज विभागलेला आहे.  हिंदू धर्मियांना शीख धर्मीय, महानुभाव सांप्रदायिक समाज जास्त जवळचा वाटतो. 

ज्या वेळेस  देशांमध्ये वाहतुकीची साधने नव्हती व या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ते नव्हते अशा ठिकाणी हजारो बैलांच्या पाठीवर अन्नधान्य तांदूळ मीठ मसाल्याचे पदार्थ व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बैलाच्या पाठीवर लादून त्याची वाहतूक करण्याचा वंजारी समाजाचा मुख्य व्यवसाय होता १३-१४व्या शतकापासून ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हा समाज रसद पुरवण्याचे काम इमाने इतबारे करीत होता. 

या समाजामध्ये काही पोट जाती आहेत त्या म्हणजे वनजारी ,बनजारी ,वंजारी लमाण, वंजारी लभाने ,गोर वंजारी ,लाडवंजारी, मथुरे बंजारी ,रावजन वंजारी याप्रमाणे पोटजाती आहे शहाजहान बादशहा आणि औरंगजेब यांच्या काळामध्ये वनजारी -बनजारी तांडे दक्षिण भारतामध्ये आले.  बैल रस्त्याने चालताना जंगलामधून चालत असतात जेणेकरून त्यांना रस्त्याने चारा मिळेल.  त्यामुळे बैल पाठी वरील बोजा सहीच रस्त्याने सरळ सरळ चालत होते . मुक्कामाच्या ठिकाणी त्यांच्या पाठीवरील बोजा वस्तू खाली जमिनीवर ढीग  करून ठेवीत व त्याभोवती रात्री आळीपाळीने पहारा देत असत.  जागे  असणारे पहारेकरी स्वतःची करमणूक म्हणून गीत गात अथवा कविता करत ,कविता  करण्यासाठी चारण समाजातील लोक फार हुशार होते. 

कवी शाहीर लेखक या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांना खूप आवडत असत ,  त्यांनी कवी शाहीर यांना बक्षिसे दिली आहेत.  त्यांच्याविषयी खूप काव्य उपलब्ध आहे भूषण भाट याचा पूर्ण एक ग्रंथ आहे.  शिवाजी महाराजांच्या सेवेतील धान्य पुरवठा करणारे  चारण वनजारे यांच्या विषयी महत्व काव्य द्वारे वर्णन केले आहे ते खालीलप्रमाणे

सेवा राजिया - शिवाजी राजे उली रोस्या चौर्याऐशी  केटरो सेवा राजिया !!ध्रुव !!

अत मडेच डेरा ,डा डा अत मडेच  कोटा !! बास्याजीरे मेल माई, सेवा करगो  चोट !!१!!

काईक  लूटे ज्वारी, बाजरी, काईक  लुटे रागी !! बास्याजीरे  कॅट मेल ,सेवा लुटे बानी !!२!! 

उली रोस्या ,चौर्याशी केट सेवा अबरन होती , जबरन होती कोई जबरन होती!!३!! 

 एक सेवा न होते,ते  सबकी सुन्नत होती !!

उली  रोस्या चौर्याशी  कोटरो  सेवा राजीया  थोर !!४!! 

अर्थ -अहो दिल्ली वासियांनो  सेवाजी(शिवाजी) हा चौर्याशी  गडांचा राजा होता . गडा सारखेच बादशहाचे डेरे बिकट असताना त्यात सुद्धा शिरून त्याने बादशहास चकविले पुष्कळसे धान्य ज्वारी, बाजरी, रागरी (रसद) तुटली गेली असताना सुद्धा आपल्या पराक्रमाने जीव धोक्यात घालून त्याने आपली बाजू कीर्ती कायम राखली आहे.  सेवाचे  (शिवा )चौर्याशी  दुर्ग अप्रतिम अवर्णनीय व बिकट होते.  त्या दुर्गाची आणि सेवा ची (शिवाजी) शत्रूवर फार जरब होती सेवा झाला नसता तर सर्वांची सुंता झाली असती. 

कभी बस्या धाडी याने सेवा भायास (शिवाजी राजांना) उद्देशून केलेले काव्य कवीच्या सौंदर्याच्या नजरेची,शूर पुरुषा विषयी   श्रद्धा, आपुलकी त्याच्यासाठी असलेली निस्सीम भक्ती, राष्ट्रासाठी असलेली भक्ती, राष्ट्राभिमान या गुणांची ओळख या दोह्यातून होते.  शिवाजी महाराज हे कवी चारण भाट आणि शाहिराचे  स्फूर्ती स्थान होते.  आई विषयी चारण कवी लिहितो

धरती रो मांडण मोलिया !वंशरो  मांडणं सूत !! तनेरी  मांडण  तरिया! बापू तीरो मांडण !!१!! 

जलमतेस माता !  सामंत सूरवीर !! 

 नितो  रिजो माता वान्झडी ! मत गमाओ  जो  मुखलारो नूर !!२!!

वीरदेश माता सामंत सूर परमुलुखोपर  काम सूधोर !!  तारो नाम धरेस तारो नाम धरेस!!३!!

अर्थ -या पृथ्वीला मेघ, मेघाला पृथ्वी,शरीराला रमणी (तरुणी) शोभा देतात त्याचप्रमाणे वंशाला पुत्र शोभा देतात.  हे स्त्रिये  ज्याला जन्म देशील तो शूर वीर आणि श्रेष्ठ होईल अशालाच जन्मास घाल न पेक्षा तु वांझोटी राहा.  तोंडाला काळोखी फासणारा पुत्र प्रसवू नकोस तेव्हा जो परकीय मुलुख पादाक्रांत करील अशा नरश्रेष्ठ राजास जन्म दे कि जो तुझ्या नावाचा जयजयकार करील तुझे नाव धरणीवर उज्वल करील.  

लखक : नारायण आव्हाड 

संदर्भ :  वंनजारी- बंनजारी 

सुशाकीर्ती प्रकाशन ३१  १२ १९९९  

लेखक पि. के. पाटील (आंधळे)

Post a Comment

0 Comments