बाळ बोठे तोफखाना पोलिसांच्या ताब्यात
वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेड च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ होतांना दिसत असून त्याला आज तोफखाना पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.
बाळ बोठे याला १३ मार्च रोजी हैद्राबाद येथून ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या अडचणीत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे . प्रथम रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणी त्याला पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात आणि आता तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या प्रकरणात पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे.
0 Comments