अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग .... स्वराज्याचे पहिले सरसेनापती व युद्धनिती तज्ञ माणकोजी दहातोंडे

 अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग .... 

स्वराज्याचे पहिले सरसेनापती व युद्धनिती तज्ञ माणकोजी दहातोंडे

 मोगलांच्या खूप युद्धामध्ये माणकोजी यांनी प्रचंड पराक्रम केला होता.  शहाजहान व आदिलशहा यांच्या मध्ये खूप मोठा तह  झाला त्यानंतर शहाजीराजे व माणकोजी विजापूरकरांच्या सेवेत दाखल झाले होते ,व शहाजीराजांनी स्वातंत्र्याची कल्पना माणकोजीस  बोलून दाखवली होती.  त्यावेळेस त्यांना खूप आनंद झाला आणि स्वातंत्र स्वराज्याचे पहिले सरसेनापती म्हणून शहाजीराजांनी माणकोजी यांची नेमणूक केली.  आणि या नेमणुकी प्रमाणे माणकोजी शिवाजी महाराजांच्या मदतीसाठी पुण्यात दाखल झाले.  शहाजी यांचा  माणकोजी हा खूप जुना व इमानदार माणूस माणकोजीचा अनुभव व युद्धनीती यामुळे शिवाजी महाराजांनी अनेक युद्धे जिंकली माणकोजी यांना गनिमीकावा तज्ञ म्हणून ओळखले जात होते. 

लोहगड व विसापूर किल्ले माणकोजी यांनी स्वतः जिंकले पुरंदरचा किल्ला पहिल्याने जिंकला त्यावेळेला शिवाजी महाराज यांच्या बरोबर माणकोजी यांनी यांनी खिंड लढवली होती.  व रणतेरडीच्या घाटामध्ये माणकोजी व रघुनाथ बल्लाळ यांनी सन १६५६ मध्ये नाकेबंदी करून जावळी जिंकली होती.  दिनांक १४ मे १६५६ मध्ये युवराज संभाजी यांचा जन्म झाला त्या वेळेला माणकोजी यांना खूप आनंद झाला . या खुषी मध्ये माणकोजी यांना बढती मिळाली सन १६५९ मध्ये मानकोजी यांना स्वराज्याचे प्रमुख सल्लागार व युद्धशास्त्र तज्ञ म्हणून त्यांची नेमणूक केली व जिजाबाई यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  त्यामुळे सन १६५७ हे वर्ष त्यांच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे ठरले

माहे जुलै सन १६६२  च्या दरम्यान शिवाजी महाराज हे माणकोजी आजारी असल्यामुळे त्यांना भेटावयास गेले असता ते शिवापूर येथे खूप आजारी होते, तरी त्यांना स्वराज्याची खूप काळजी वाटत होती महाराजांना शाहिस्तेखानाचा बंदोबस्त करण्यास सांगताना माणकोजी माँ  साहेबांना मुजरा सांगतात.  त्यांची स्वराज्य प्रति असलेली तळमळ पाहून शिवाजी महाराजांना गहिवरून येते.  नंतर त्यांचे निधन होते महाराजांनी काळजावर दगड ठेवून त्यांचे शेवटचे अंत्यविधी सहकार्य केले.  एक साथ ३५ वर्ष सेवा करणारे शिवाजी महाराज व शहाजी महाराज त्या दोघांसाठी सरसेनापती म्हणून काम करणारे त्यामध्ये शहाजी राजे यांच्या बरोबर पंधरा वर्षे शिवाजी महाराज यांच्या बरोबर वीस वर्षे काम करणारे यामध्ये सलग सतरा वर्षे सेनापती म्हणून काम करणारे आणि बाकी वर्षे युद्धनीती तज्ञ व स्वराज्याचे प्रमुख सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.  त्यांना संपत्तीचा कधीच मोह झाला नाही.  शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वराज्याची चिंता वाटत असायची. 

अफजलखानाच्या लढाईमध्ये माणकोजी यांचा  मोलाचा हातभार होता.  त्या लढाईचे नियोजन माणकोजी यांनी केले होते.  शिवाजी महाराज अफजलखान वधाच्या नंतर गडावर आले तेव्हा माणकोजी यांना मिठीच मारली व काम फत्ते झाले म्हणून सांगितले.  पुण्यामध्ये माणकोजी व शहाजी यांची भेट होते.  नंतर कालांतराने त्यांची तब्येत ढासळते.   चांदा तालुका नेवासा येथील माणकोजी दहातोंडे हे स्वराज्याचे पहिले सेनापती युद्धनीती तज्ञ स्वराज्याचे सल्लागार म्हणून मनमिळावू आनंदी स्वभाव असे माणकोजी यांचे सन १६६२ मध्ये महानिर्वाण झाले . 

लेखक :

नारायण आव्हाड 

९२७३८५८४५७

संदर्भ ग्रंथालय 

ऐतिहासिक वस्तुसंग्रहालय अहमदनगर

Post a Comment

0 Comments