बोठे याच्या हैदराबादेतील सहकाऱ्यांची जामिनावर सुटका
वेब टीम नगर : रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे हा पसार काळात हैद्राबाद येथे असतांना त्याला मदत केल्याच्या कारणावरून अटकेत असलेले वकील जनार्दन अकुला चंद्रप्पा २) राजशेखर अंजय चाकाली ३) शेख इस्माईल शेख अली आणि ४)अब्दुल रहमान अब्दुल अली सर्व राहणार हैद्राबाद आणि महेश वसंतराव तनपुरे रा. नगर या चौघांना जामीन मंजूर झाला असून त्यात महेश वसंतराव तनपुरे याची सुटका झाली आसुन हैद्राबाद येथील चार जणांच्या कागदपत्रांच्या पूर्तते अभावी अद्याप सुटका झालेली नाही.
आरोपींची बाजू मांडतांना ॲड ठाणगे यांनी सुप्रीम कोर्टाच्या अनेक खटल्यांचे निकाल न्यायालयासमोर मांडल्याने या आरोपींकची जामिनावर सुटका झाली.
दरम्यान, महेश तनपुरे याच्या घरातून संपर्कासाठी वापरलेले फोन जप्त करण्यात आलेले आहेत तर पोलीस कोठडीत असलेल्या बाळ बोठेची पोलिसांनी रात्रभर कसून चौकशी केली असून त्याच्या कडून माहिती काढण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
0 Comments