"जशी हेडमास्तर तशी शाळा" कांचन पगारिया -गावडे

                "स्वयंसिद्धा" 

 "जशी हेडमास्तर तशी शाळा" कांचन पगारिया -गावडे 

माझ्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक मुलीत मी स्वतःला बघते त्यामुळे या मुली सर्वच बाबतीत सक्षम असल्या पाहिजेत याकडे कटाक्षाने लक्ष देते घड्याळाकडे बघून काम करण्याची माझी वृत्ती कधीच नव्हती आणि आजही बारा तास काम करते याचा मला अभिमान आहे. असं मत कांचन पगारिया- गावडे यांनी व्यक्त केलं.       

कांचन पगारिया गावडे या शिशुसंगोपन या संस्थेच्या श्रीकांत पेमराज गुगळे विध्यालयाच्य् तसेच महेंद्र वारे कनिष्ठ महाविदयालयाच्या प्राचार्या  आहेत. 

 आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी टिकले पाहिजेत त्यासाठी त्या जिवाचे रान करतात. त्यांचे कित्येक विद्यार्थी विद्यार्थीनी आज रस्त्याने जातानाही त्यांना वाकून नमस्कार करतात.  क्षेमकुशल विचारतात आणि स्वतः करत असलेल्या प्रगतीचा धांडोळा बाईंसमोर मांडतात, तसं बाईही  त्याला शाबासकी देतात हेच विद्यार्थी म्हणजे बाईंनी कमावलेली संपत्ती आहे. 

            मुलींना समुपदेशन त्यांच्यातील  क्षमतेची तिला कल्पना देतात, मग मुलींनी ठरवायचे की तिला काय करायचे आहे, त्यानुसार शिक्षकांनी मार्गदर्शन करायचं असं शिक्षणाबद्दलची बाईंची भूमिका असते.  त्यामुळे मुलींवर आवाजवी  शिक्षणाचे ओझे लादले जात नाही आणि ठरवलेल्या ध्येयाकडे योग्य शिक्षण मिळाल्याने मुलींचे ही करियर घडते.  आजकाल मुलींची बौद्धिक क्षमता वाढली आहे.  त्यात त्यांना घरातील वातावरण पोषक असेल तर त्या व्यवस्थित मार्गक्रमण करतात, अन्यथा अशा मुली भरकटायला वेळ लागत नाही, म्हणून काही गोष्टी आपल्या कलाने , काही पालकांच्या आणि काही गोष्टी मुलींच्या कलाने घेऊन त्यांना शिक्षण दिल्यास त्या मुलींचे करियर घडते असा अनुभव कांचन पगारिया- गावडे यांचा आहे

शाळेत शिकवताना मुलींच्या  आरोग्याची त्या विशेष काळजी घेतात शारीरिक स्वच्छतेबरोबरच स्त्रियांच्या शरीरधर्माबाबत त्या विशेष जागरूक असतात, त्यासाठी त्यांनी वुई ,अस एन अवर  फाउंडेशन कडून डॉक्टर प्राजक्ता सावेडकर यांच्या माध्यमातून 'पॅड वेंडिंग 'मशीन मिळवलं ,या महिला दिनी हे मशीन मुलींच्या वापरासाठी बसवण्यात येणार आहे . याशिवाय मुलींना स्वसंरक्षणार्थ स्मार्ट गर्ल्स प्रशिक्षण देण्याची सोय शाळेने केली  आहे ,जेणेकरून मुली कोणत्याही प्रसंगाला धीरोदात्तपणे तोंड देऊ शकतील . 

मुलींचा  सर्वांगिण विकास व्हावा यासाठी विद्यालयात निबंध, वकृत्व, मेहंदी, चित्रकला यासारख्या स्पर्धा भरविल्या जातात.  कांचन पगारिया -गावडे यांच्या मते प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्याचं गणित  सोडवता यायला हवं त्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षण दिले गेले पाहिजे . एखाद्या मुलीला उत्तम मेंदी काढता येत असेल तर ती मेहेंदीचा  व्यवसाय करू शकते . एखाद्या मुलीला शिवणकामात गती असेल तर आजकालच्या फॅशनच्या जमान्यात व्यवसायातही यशस्वी होऊ शकते, त्यासाठी तिला प्रशिक्षण दिले पाहिजे आणि तेही तिच्या मातृभाषेत दिले  तर तिला उत्तमरित्या अवगत होईल.  आमच्या विद्यालयात एन एम एम एस (राष्ट्रीय आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती) साठी आम्ही मुला-मुलींना प्रोत्साहित करतो.  तुला हे  जमेल, तू प्रयत्न कर अशा शब्दात मुलांना 'मोठीव्हेट ' केलं तर ती आवर्जून प्रयत्न करतात.  'प्रयत्ने कण रगडीता वाळूचे तेलही गळे 'या उक्तीप्रमाणे मुलांना ते जमतेच आणि एकदा आपण करू शकतो असा विश्वास मुला-मुलीत निर्माण झाला की मग ते आपोआपच प्रयत्नाने या गोष्टी करायला लागतात फक्त त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्याची गरज असते.  आणि ते  आम्ही करतो . 

मी स्वत: दिवसातील १२ तास काम करते ,मग इतरही शिक्षकांना ते करावं लागतं ,त्यामुळे तेही विद्यार्थयांच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देऊ लागले आहेत. त्यामुळे 'जशी हेडमास्तर तशी शाळा 'असं समीकरण होऊ लागल्याने घड्याळाकडे बघून काम करण्याची त्यांची वृत्ती बदलली आणि त्यांच्यातही भावी पिढी घडविण्याची उरमी जागृत झाली. अर्थात यासर्व गोष्टी घडण्यामागे संस्थेचे पाठबळ आवश्यक असते .  आमची संस्था चांगल्या उपक्रमांसाठी आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहते त्यामुळे आमच्या कामाचा हुरूप वाढतो असे कांचन पगारिया- गावडे आवर्जून सांगतात.  


Post a Comment

0 Comments