आरोग्य आहार
फणसाची भाजी
साहित्य : कवळ्या गराचा फणस एक,अर्धी वाटी हरभरे आणि लाल चवळी आदल्या दिवशी भिजवून घ्यावेत, दोन टेबलस्पून शेंगदाणे हरभऱ्या बरोबर,पाच-सहा सुक्या लाल मिरच्या ,एक नारळ खोऊन ,१ डावभर तेल फोडणीचे साहित्य,मीठ गूळ चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट
कृती:
१) विळी किंवा सुरीला तेलाचा हात लावून फणस साल काढून मधला पावा सारखा भाग चिरून काढावा कवळा फणसाच्या बिया याबरोबर विरल्या जातात.
२) एक डावभर तेलाची मोहरी हिंग हळद घालून फोडणी करावी, त्यात भिजवलेले हरभरे किंवा चवळी शेंगदाणे घालावे व पाण्याचे झाकण ठेवून पाणी द्यावी भाजी शिजवून घ्यावी
३) भाजी शिजल्यावर मीठ, गूळ ,लाल तिखट व खवलेले खोबरे घालून भाजी पूर्ण शिजवावी भाजीला पाणी सुटले तर आटवून टाकावे व भाजी उतरवावी एक वरील भाजीला मसाल्याची जरुरी नाही फक्त ओला नारळ भरपूर घालावा म्हणजे भाजी छान लागते.
0 Comments