मूलमंत्र आरोग्याचा
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
योगसाधना : उत्कटासन
उत्कट म्हणजे शक्तिमान भीतीदायक किंवा उंचसखल हे आसन काल्पनिक खुर्चीवर बसण्यास प्रमाणे असते
पद्धती :
१) ताडासनात उभे रहा हात डोक्यावर उभे धरा आणि तळहात जुळवा .
२) श्वास सोडा, गुडघे वाकवा आणि मांड्या जमिनीशी समांतर होतील अशा तऱ्हेने धड वाकवा.
३)पुढे वाकू नका उलट छाती जितकी मागे खेचून धरता येईल तितकी ठेवा श्वसन नेहमीप्रमाणे असू द्या.
४) सुमारे 30 सेकंद या स्थितीत राहा या आसनात तोल सांभाळणे कठीण असते.
५) श्वास घ्या, पाय ताठ करा हात खाली आणा पुन्हा ताडासनात या आणि विसावा घ्या.
परिणाम:
या आसनामुळे खांद्या मधील ताठरपणा नाहीसा होतो आणि पायामधल्या बारीक-बारीक विकृती ठीक होतात. घोटे मजबूत बनतात आणि पायाचे स्नायू समतोलपणे विकसित होतात छाती व पोट यामधील पडदा वर उचलला जातो आणि हृदय सौम्यपणे दाबले जाते . पोटाचे अवयव आणि पाठ यांना दृढता येते आणि छाती पूर्णपणे फुगविल्या गेल्यामुळे विकसित होते . अश्वारोहकांना हे आसन लाभदायक आहे.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आरोग्य आहार : अळूची पातळ भाजी
साहित्य :
चार छोट्या गड्ड्या आळु ,अर्धी गडडी आंबट चुका, एक नग मुळा, चिंचेचा कोळ, एक वाटी डाळीचे पीठ, शेंगदाणे काजू तुकडा, एक चमचा हरभरा डाळ ,मूठभर ओल्या नारळाचे तुकडे,गूळ मीठ चवीनुसार, कढीलिंब ,चार-पाच सुक्या लाल मिरच्या ,दोन डाव तेल, मोहरी, हिंग, हळद, पाव चमचा मेथ्या ,तीन-चार हिरव्या मिरच्यांचे तुकडे ,दोन टेबल्स्पून सुके खोबरे, व एक चमचा जिरे थोडे भाजून कुटून घ्यावे, एक चमचा लाल तिखट.
कृती :
१)आळूची पाने देठापासून कापून घ्यावीत व स्वच्छ बारीक चिरावीत देठ साल काढून सोलून बारीक चिरावे ,आंबटचुका धुऊन बारीक चिरून व मुळा मध्ये पातळ चिरून त्यात मिसळावा .
२) डावभर तेल पातेल्यात गरम करून त्यात मेथ्या व हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावेत व आळूची चिरलेला व चुका घालून शिजेपर्यंत दोन वाफा द्याव्यात. ३) अळू शिजतांना भिजलेले दाणे, काजू, हरभरा डाळ व खोबऱ्याचे तुकडे त्यात घालावेत.
४) अळू शिजले की वाटीभर डाळीचे पीठ घालून घोटावे व सहा- सात वाट्या पाणी घालावे.
५) उकळी यायला लागेपर्यंत ढवळावे मग त्यात चिंच, गूळ, मीठ ,लाल तिखट चवीनुसार घालावे भाजून कुटलेले जिरे, खोबरे घालावे व भाजी उकळून घ्यावी ही भाजी आंबट गोड करावी. गुळाबरोबर एक टेबलस्पून साखर घालावी व चव चांगली येते.
६) कढईत एक डावभर तेल तापवून मोहरी, हिंग, कढीलिंब ,सुक्या मिरच्या व हळद घालून खमंग फोडणी करून अळूवर घालावी.
७) वरील साहित्यात दहा वाट्या आळूची भाजी होते.
टीप :
१)अळूच्या भाजीत आंबट चुका घातल्याने अळू मिळून येतो. खाजत नाही व चिंचेचा वापर कमी करावा लागतो.
२) वरील प्रकारची आळूची भाजी ही पोटातील विकारांसाठी उत्तम मानली गेली आहे.
0 Comments