अहमदनगर जिल्ह्याचे अंतरंग
सरकार अहमदनगर
सरकार अहमदनगर यामध्ये 10 परगणे होते ते पुढील प्रमाणे परगणे हवेली अहमदनगर परगणे पांडे पेडगाव परगणे नेवासे परगणे शेवगाव परगणे चांभार गोंदे ,परगणे जामखेड परगणे आष्टी परगणे बारागाव नांदूर, परगणे कडेवळीत परगणे राशीन. पुर्वी हा जिल्हा पूर्वेकडे व दक्षिणेकडे जास्त पसरलेला होता. संगमनेर अकोले कोपरगाव व पारनेर आणि बराच भाग हे तालुके नगर जिल्ह्यात नव्हते. परंतु जामखेड व नगर जिल्ह्यातील मोगलाईचा सर्व भाग तसेच करमाळा तालुका नगर जिल्ह्यात होता.
पूर्वीच्या दहा परगण्यांत पैकी शेवगाव नगर जिल्ह्यात होते परगणे आणि तालुका यात फरक नाही. मिरी व काही गावे त्या परगण्यात होती. माणिकदौंडी वगैरे गावे पांडे पेडगाव परगण्यात होती. हा या पारगण्यामुळे दिल्लीचा बादशाह अहमदशाह यांनी रामराव नारायण मिरीकर यांना बक्षीस दिला होता. रामराव नारायणराव त्यावेळी दिल्ली येथे मराठ्यांचे वकील म्हणून काम करत होते. त्यांनी पुढे त्याचा स्वीकार न करता त्यापैकी फक्त आपल्य वतनाची गावे आपल्याकडे ठेवून बाकीचा त्याचे मालक शिंदे यांस देण्याची बादशाहास विनंती केली त्यावरून बादशहांनी तो भाग शिंदे यांस दिला.पुढे शिंदे व होळकर यांनी आपसात वाटणीकरून घेतली ती वाटणी रामराव नारायण यांच्या हातानेच १७५१ च्या सुमारास झाली व त्याप्रमाणे पुढे वहिवाट चालू होती. कसबे मिरी, शिंगवे केशव व राजेगाव हि तीन गवे मिरीकरांकडे व पाथर्डी, हादगाव, लाडजळगाव व खरवंडी ही चार भागीरथीबाई शिंदे यांच्याकडे चोळी बांगडी करता जाहीर होती, या परगण्यांचा डाकंदर तनखा २लाख 32 हजार १ रुपये साडेचौदा आणे होता. इसवी सन १८१८ च्या सुमारास होळकरांची गावे तर इसवीसन १८६५ मध्ये तह होऊन शिंदे यांची गावे इंग्रजांच्या हवाली गेली. परगणे हवेली अहमदनगर हा परगणा नगर शहर व त्याभोवतीची गावे मिळून तयार झाला होता या परगण्यात एकूण १७ गावे होती. ती अशी कसबे भिंगार, निंबोडी, वाकोडी, कापूरवाडी, सावेडी, नालेगाव, माळीवाडा, मोरचूदनगर, चाहुरणा बुद्रुक, चाहुराणा खुर्द बागरोजा, भिस्तबाग , फराहबाग , गालीमखानी, शहापूर, नागरदेवळे, वारूळाची वाडी(दरेवाडी) या परगण्यात होती. यापैकी नालेगाव मोरचूदनगर, माळीवाडा चाहुराणा बुद्रुक, चाहुरणा खुर्द, या पाच गावांचा अहमदनगर शहरातच समावेश झाला आहे.
नगरच्या पश्चिमेस सीना नदीच्या पलिकडील तिराच्या बाजूला काही इमारतीचे पाय सापडले आहेत. कदाचित यावरून समजते की या ठिकाणी पूर्वी गाव होता कालांतराने इमारती पडल्यामुळे ते गाव शहरांमध्ये समाविष्ट झाला असावे असे वाटते .
जुन्या अहमदनगर शहराची मांडणी एकंदर नऊ पुरे मिळून झालेली आहे. नगर शहराचा सन १८५३ चा नकाशा मध्ये त्यांची नोंद आलेली आहे व त्यांची नावे देखील त्यामध्ये दिली आहेत त्यांची नावे पुढीलप्रमाणे खडकपुरा, शहाजहापुरा, तोफखाना, सर्जेपुरा, कमालपुरा, कपूरपुरा, हातिमपुरा, मोगलपुरा, बेहरामपुरा या नऊ पुरांचा च्या मध्यभागी शहराच्या मध्यवस्तीत चा भाग म्हणजे गुलामालीबाग , शहाजी मोहल्ला, शहागंज ,ख्रिस्त गल्ली तख्ती दरवाजा , बेहराम वा न्यामतखानी महाल व चांदबीबी मोहोल्ला या प्रमाणे त्यांच्या नावाचा उल्लेख आढळतो.
निजामशाहीच्या शेवटच्याकाळात शहराची फार पडझड झाली तंटे , बखेडे व लढाया यांच्या धास्तीमुळे काही लोकांनी शाश्र कायमचे सोडून दिले. या काळामध्ये शहाजहान बादशहाचा सुभेदार सर्जेखान हा जेव्हा नगरचा सुभेदार झाला त्याने सर्व समाजांना स्थिरस्थावर करण्याचा प्रयत्न केला. ओसाड पडलेल्या या भागात त्याने वस्ती करविली त्यामुळे लोकांना तो आधार वाटू लागला. पुढे त्याने शहरास तटबंदी केली व ११ वेशी बांधल्या लोकांना भरोसा दिला आणि शहराची सुधारणा केली.
0 Comments