राहुरी येथील हॉटेल नंदादीप मधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा
पोलीस उपाधीक्षक संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई
दोन पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलांची सुटका ,एक आरोपी ताब्यात
वेब टीम नगर : आज दि. २९/०१/२०२१ रोजी उपाधीक्षक संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे हा पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली. त्याप्रमाणे हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली असून आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३,४,५,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, मा. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधीक्षक संदीप मिटके , पी आय गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.
0 Comments