मुंढे,हेगडे,धुरी यांनाही हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न
वेब टीम मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेने आपल्याशीही जवळीक साधण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा भाजपा नेते कृष्णा हेगडे यांनी केला आहे. आता या प्रकरणात आणखी एक नाव पुढे आलं आहे, ते म्हणजे मनसे नेते मनीष धुरी यांचं. धुरी यांनीही आपल्याला याच महिलेनं हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे या एकाच महिलेने तीन राजकीय व्यक्तींना फसवण्याचा प्रयत्न केल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेनं बदनामी करण्याच्या हेतूने हे कृत्य केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे. राज्यात सर्वत्र मुंडे यांच्या या प्रकरणाची चर्चा सुरु असताना गुरुवारी मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांनीही या महिलेनं आपल्यालाही अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा खुलासा केला. हेडगे यांनी म्हटलं की, “संबंधित महिला माझ्याही मागे लागली होती. तिने मला संबंध ठेवण्याबाबत विचारलं त्यासाठी ती तीन-चार वर्षे माझ्या मागे होती. पण मी कायमच त्या महिलेला टाळलं. या महिलेनं मला वारंवार मेसेजही केले. इतकी वर्षे मी गप्प होतो पण आता धनंजय मुंडेंचं नाव आलं आणि मला वाटलं या आधी माझंही नाव येऊ शकलं असतं त्यामुळे मी पुढे आलो आणि संबंधित महिलेबाबत खुलासा केला. तसेच तिच्याविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे. या प्रकरणानंतर मला मनेसे नेते मनीष धुरी यांचा फोन आला. त्यांनी म्हटलं की, बरं झाल तुम्ही पुढे येऊन सर्वांना हे सांगितलं कारण या महिलेनं माझ्याही बाबतीत हेच केलं आहे”
“ही महिला राजकीय व्यक्तींना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत आहे. जाळ्यात अडकल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करायचं ती काम करते. २०१० पासून या महिलेनं मलाही ब्लॅकमेल केलं. या महिलेला मी दोन वेळा भेटलो. आता त्या महिलेला माझ्यावर खटला दाखल करायचा असेल तर करु द्या माझं मन साफ आहे. तसेच मनीष धुरी यांना काय करायचं ते करतील. त्याचबरोर धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी मी हे करत नाही कारण त्यांना मी नीटसं ओळखतंही नाही,” असंही हेगडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मनसे नेते मनीष धुरी यांनी सांगितलं की, “धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या महिलेनं माझा नंबर कुठूनतरी मिळवला आणि ती मला फॉलो करत होती. तिने माझ्याशी अनेकदा जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. मोठ-मोठ्या लोकांना हेरायचा ती प्रयत्न करत असल्याचं मला कळालं होतं म्हणून मी तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. २०१८-१९ मध्ये ही महिला पैसे उकळण्यासाठी पुन्हा माझ्या संपर्कात आली. मी ही यात अडकलो असतो तर माझाही धनंजय मुंडे झाला असता. आत जर हेंगडेंनी या महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे तर मी देखील तक्रार दाखल करणार आहे.
0 Comments