फक्त शिकवणीचे पैसे घेण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश

 फक्त शिकवणीचे पैसे घेण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश 

मनसे पदाधिकारी यांनाही आदेशाची प्रत 

वेब टीम नगर : ज्या माध्यमांचा, गोष्टींचा विध्यार्थ्यांनी वापर केला नाही अशी सर्व फि पालक शिक्षक संघाच्या शाळेतील कमेटीत ठराव करुन फक्त शिकवणी फि एक,दोन, किव्हा तीन टप्प्यात सर्व शाळेंनी फि भरुन घ्यावी. तसेच फि ची अडवणुक करुन कुठल्याही प्रकारे ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचे बंद  करू नये तसेच १० वीच्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरणे थांबऊ नये. असे आदेश दिनांक ४ जानेवारीला रोजी ज शिक्षण अधिकारी रामदास हराळ  यांनी जिल्ह्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांना दिले त्याचे पत्र मनसेच्या नितीन भुतारे यांनाही दिले आहे.

 लॉकडाउन काळात शाळा बंद असल्यामुळे न वापरण्यात आलेले कॉम्प्युटर, ग्रंथालय, बस स्टेशनरी इ. फी माफ करून फक्त शिकविण्याचीच फी घ्यावी अशी मागणी मनसेच्या वतीने शिक्षण अधिकारी रामदास हराळ यांचेकडे केली होती. त्या अनुषंगाने हराळ यांनी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळा यांना आदेश दिले  आहेत.

 भुतारे म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या माध्यमातुन कोरोना काळातील सन २०२०-२०२१ या वर्षा अंतर्गत इयत्ता ३री ते पुढिल सर्व शिक्षण हे विध्यार्थी शाळेत न बोलावता ऑनलाईन शिक्षण शाळेंनी द्यावे असे आदेश राज्य सरकारने दिले होते. त्या अनुशंघाने शिक्षण देण्यास सुरवात झाली. हे सर्व सुरु झालयावर शाळेंनी फि चा तगादा लावण्यास पालकांना सुरवात केली. या संबधी मनसेच्या वतीनवेवतीने वेळोवेळी पाठपुरवठा करुन लॉकडाऊन मध्ये अनेकांचे काम,धंदा,व्यवसाय बंध असल्यामुळे अनेक पालक अडचणीत आले होते. अनेकांच्या विध्यारर्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण शाळेची फि भरली नाही. त्यामुळे अनेक पालकांनी सर्व शाळेंना इतर सर्व फि माफ कराव्यात अशी मागणी केली परंतु शाळेंनी संपुर्ण फि भरण्याचा तगादा चालुच ठेवला. त्यानंतर पालकांनी व मनसेच्या वतीने दिनांक २८ डिसेंबर रोजी  लॉकडाऊन काळात शाळा बंध असतांना ज्या गोष्टी विध्यार्थ्यांनी वापरल्याच नाही त्यातील कम्पुटर फि, ग्रंथालय फि,बस फि, स्टेशनरी फि तसेच ईतर फि माफ करुन फक्क्त शिकवणी फि घ्यावी अशी मागणी मनसेने केल्यानंतर शिक्षण अधिकारी यांनी सर्व मागण्या मान्य करुन जिल्ह्यातील सर्व खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पत्र पाठवले आहे.

तसेच कोणालाही या विषयी खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी कुठल्याही प्रकारे विध्यार्थी व पालकांची अडवणुक केली तर महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे जिल्हाअध्यक्ष्य सचिन डफळ जिल्हा सचिव नितीन भुतारे,शहराध्यक्षय गजेन्द राशिनकर महिला जिल्हा अध्यक्षा अ‍ॅड अनिता दिगे उपजिल्हाअध्यक्ष मनोज राऊत  तसेच शहरातील मनसेच्या सर्व उपशहराध्यक्ष यांच्याशी बरोबर   संपर्क साधुन शिक्षण अधिकारी यांचे आदेशाचे पत्र घेऊन  जावे. असे अवाहन मनसेच्या नितीन भुतारे यांनी  केले.

Post a Comment

0 Comments