स्व.अनिल राठोड यांचा हिंदुत्वाचा वारसा विक्रम राठोड यांनी पुढे चालवावा
विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त मंत्री दादा वेदक : शहर शिवसेनेतर्फे विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त मंत्री दादा वेदक यांचा सत्कार
वेब टीम नगर : ५०० वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम मंदिर निर्माण होत आहे.अनेक कारसेवकांनी बलिदान दिले आहे. श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे सर्वत्र निधी संकलन अभियान राबविले जात आहे.श्रीराम मंदिर निर्माणच्या या अभियानातकार्यात सर्वानी हातभार लावावा.माजी आ.स्व.अनिल भैया राठोड हे प्रखर हिंदुत्ववादी,देश भक्त व गौभक्त,रामभक्त होते. श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनास त्यांनी पाठींबा दिला होता.वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलनही केले आहे.शिवालय येथे आजही त्यांच्या स्मृती आहेत.त्यांनी जनतेचे प्रश्न सोडवून लोकप्रिय आमदार म्हणून नावलौकीक मिळवला आहे.त्यांच्या आकस्मित निधनाने हिंदुत्ववादी नेता हरपला आहे.नगर शहरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.स्व.अनिल राठोड यांचा हिंदुत्वाचा वारसा विक्रम राठोड यांनी पुढे चालवावा.असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त मंत्री दादा वेदक यांनी केले.
श्रीराम जन्मभूमी न्यासातर्फे निधी संकलन अभियानाची माहिती देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेचे संयुक्त मंत्री दादा वेदक यांनी शिवालय येथे सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड,शिवसेना प्रमुख दिलीप सातपुते,नगरसेवक संभाजी कदम,दत्ता कावरे,श्याम नळकांडे, संजय शेंडगे,अनिल बोरुडे,संतोष गेणाप्पा,दत्ता जाधव,शिक्षक सेनेचे अंबादास शिंदे,शिवसेना महिला आघाडीच्या अरुणाताई गोयल आदी उपस्थित होते.याप्रसंगी दादा वेदक यांचा सत्कार शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या हस्ते करण्यात आला.
विक्रम राठोड म्हणाले कि,अयोध्येत श्रीराम मंदिर व्हावे हि माजी आ.स्व.अनिल राठोड यांची इच्छा होती.५ ऑगष्ट रोजी श्रीराम मंदिराचा भूमी पूजन सोहळा भैयांना बघायचा होता.परंतु त्यांच्या आकस्मित निधनाने ते अर्धवटच राहिले.श्रीराम जन्मभूमीच्या निधी संकलन अभियानात शिवसेना हि घरोघरी जाऊन निधी संकलनाचे कार्य करील.तसेच मोठा निधी मिळवून देऊन स्व.अनिल राठोड यांचे स्वप्न पूर्ण करतील.
दिलीप सातपुते म्हणाले कि,श्रीराम मंदिर होत असल्याचा आनंद सर्व शिवसेनिकांना झाला आहे.मी राम मंदिरासाठी १ लाख रुपये निधी देत असून शिवसेना पदाधिकारी व शिवसेनिक हि या कार्यात हातभार लावतील.असे सांगितले.
संभाजी कदम म्हणाले कि,श्रीरामाच्या कार्यात शिवसेना नगरसेवक घरोघरी जाऊन निधी गोळा करतील.श्री राम मंदिराच्या कार्यात पूर्ण वेळ काम करत सूत्र संचालन गौतम कराळे यांनी केले तर आभार संतोष गेनाप्पा यांनी मानले.
0 Comments