मूलमंत्र आरोग्याचा : योगसाधना ,आरोग्य आहार

मूलमंत्र आरोग्याचा 

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

योगसाधना
अर्धमत्स्येंद्रासन


 हे आसन मत्स्येन्द्र ऋषीनी प्रथम सांगितल्याने याला मत्स्येंद्रासन असे म्हणतात . हेकरन्यासावाघडा असल्याने त्याच्या कृतीत काही बदल करून सुकरता आणली आहे. म्हणून याला अर्धमत्स्येंद्रासन म्हटले गेले. हे आसन करण्यापूर्वी याचा नीट अभ्यास केला तर हे आसन जमू शकेल व यात निर्माण होणारे ताण व ताण सहन करण्याची शरीराची तयारी होईल .

क्रिया : आसनस्थिती घेणे

पूर्व स्थिती - बैठक स्थिती

१) डावापाय गुढघ्यात वाकवून   उजव्या गुढघ्याच्या पलीकडे डाव्या पायाची टाचा येईल अशा पद्धतीने जमिनी वर ठेवा

२) उजव्या पायाची घडी करून मांडी घातल्या प्रमाणे तो पाय ठेवा

३) उजव्या हाताने डाव्या गुढघ्याला तिढा देऊन डाव्या पायाचा अंगठा पकडा

४) खांदे व मान जास्तीतजास्त डावीकडे वळवा. डावा हात डाव्या बाजूने मागून कमरे भोवती फिरवून तळवा बाहेर राहिल अशा तऱ्हेने ठेवा . दृष्टी डावी कडून  मागच्या दिशेने फिरवून स्थिर ठेवा . श्वसन संथपणे चालू ठेवा .


आसनस्थिती सोडणे ;

१) मान वळवून दृष्टी सरळ करा.

२) दोन्ही हात जागेवर घ्या .

३) घडी घातलेला उजवा पाय सरळ करा .

४) डावा पाय जागेवर आणून बैठक स्थिती घ्या

टीप : याच पद्धतीने उजवा पाय डाव्या गुडघ्या शेजारी उभा करून उजव्या बाजूने हेच आसन करा . त्यात आवश्यक ते बदला करून घ्या .

वर वर्णन करतांना एकाच दिशेला वळताना करावयाची कृती दिली आहे. दुसर्या बाजूला वळताना तशाच गोष्टी अंमलात आणावयाच्या आहेत . मात्र डावा उजव्याचा बदल त्यात करून घ्यावा लागेल .

कालावधी

हे आसन जेवढ्या अवस्थेपर्यंत जमेल तेवढ्या अवस्थे पर्यंत स्थिर राहून दोन  मिनीटे पर्यंत ते टिकवून स्थिर ठेवा 

(दोन्ही बाजूस प्रत्येकी दोन मिनीटे )नंतर अभ्यासाने  आदर्श अवस्थेपर्यंत प्रगती करा व ती  स्थिती कमीत कमी दोन मिनीटांपर्यंत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. नीट सराव झाल्यानंतर प्रत्येक बाजूस पाच मिनीटांपर्यंत याचा कालावधी वाढवण्यास हरकत नाही . वक्रासनाचीच ही प्रगत अवस्था आहे. त्यामुळे या आसनाचे सर्व फायदे या आसनाने अधिक प्रकर्षाने मिळतात. बद्धकोष्ठता व अग्नीमांद्य यासारख्या पचनाच्या विकारांवर या आसनाचा अनुकूल परिणाम होतो.

विशेष दक्षता

वक्रासनात सांगितलेली सर्व काळजी याही आसनात घेणे गरजेचे आहे. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आरोग्य आहार

मेथ्यांचे लाडू

साहित्य : एक वाटी मेथ्यांचे दळून केलेले पीठ , २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा किस , १ वाटी खारकेची पूड , अर्धी वाटी खस खस, २ वाट्या कणिक ,३ वाट्या पिठी साखर , २ वाट्या तूप , १ जायफळ किसून , अर्धी वाटी बदाम.

कृती : तुपामध्ये मेथ्यांचे पीठ भाजून घ्या. उरलेल्या तुपात कणिक खमंग भाजावी. बदामचही पूड अथवा काप करून घ्यावी. कास खास ,खोबरं भाजून पूड करावी खारीक पूड , जयफळ व पिठीसाखर घालून सर्व जिन्नस एकत्र करुन छोटे छोटे लाडू वळावेत.

टीप :

*  हे लाडू चवीला जरी कडू असले तरी औषधी आहेत. हवेतर मेथ्यांचे प्रमाण काम करून कणकेचे प्रमाण वाढवावे.

* पिठीसाखरे ऐवजी किसलेला पिवळा गुळ वापरावा लाड खमंग होतो.

 



 

Post a Comment

0 Comments