महिला कॉन्स्टेबल्सचा अनोखा सन्मान

 महिला कॉन्स्टेबल्सचा अनोखा सन्मान 


वेब टीम नगर : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असतांना नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई  फुलेंना अभिवादन केल्यानंतर ३ महिला कर्मचाऱ्यांना दिवस भरासाठी विविध पदांवर काम करण्याची संधी देऊन त्यांचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला.  


त्यात महिला पोलीस कॉन्स्टेबल गहिले , महिला पोलीस कॉन्स्टेबल सय्यद आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल भिंगारदिवे यांना पोलीस ठाणेअंमलदार आणि वायरलेस विभागात मदतनीस म्हणून काम करण्याची संधी मिळाली हे कामही या महिला कॉन्स्टेबल्सनी अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे. तर तोफखाना पोलीस ठाण्यानेही नवा पायंडा पाडल्याने कौतुकास पात्र ठरले आहे.    

Post a Comment

0 Comments