नव्या वर्षाचे जगभरात उत्साहात स्वागत
अंतराळवीरांनीही दिल्या पृथ्वी वासियांना शुभेच्छा
वर्ष २०२१ सुरू झाले असून जगभरात नव्या वर्षाचे उत्साहात स्वागत झाले. या वर्षासोबतच एका नव्या दशकाचीही सुरुवात झाली आहे. मागील वर्षात करोना महासाथीचा आजार, नैसर्गिक संकटांना सामोरे जावे लागले होते. त्यामुळेच नव्या वर्षाचे जगभरातील लोकांनी दणक्यात स्वागत केले. काही देशांमध्ये करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले. घड्याळात मध्यरात्रीचे १२ वाजल्यानंतर आतिषबाजी करण्यात आली.
दुबईतील बुर्ज खलिफावर डोळ्याची पारणे फेडणारी रोषणाई करण्यात आली असून तेथील लेझर रोषणाई यापुढेही काही दिवस पाहायला मिळणार आहे.
न्यूझीलंड, वुहान, तैपईत जल्लोषाने स्वागतकरण्यात आले असून तेथेही इमारतींना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यासर्व ठिकाणी कोरोना मूळे निर्बंध लागू केले असतांनाही लोकांनी रस्त्यावर येऊन नववर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात केले. अथेन्स आणि न्यू यॉर्क मध्ये मात्र कोरोना च्या प्रादुर्भावा मुळे रस्त्यावर सन्नाटा पसरल्याचे चित्र पाहायला मिळाल.
तर अंतराळात असलेल्या वैज्ञानिकांनीही अंतराळातून पृथ्वीवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments