हिवाळ्यात घ्यावयाचा आहार

हिवाळ्यात घ्यावयाचा आहार 

आपल्या आहारावर आपले आरोग्य अवलंबून असते.  आपला आहार चांगला असेल तर सहाजिकच आपले आरोग्यही चांगले असते . आपण काय, कधी, कसे ,किती प्रमाणात खातो यावर आपले आरोग्य अवलंबून असते उन्हाळ्यामध्ये आपल्यालाच थंड अन्न प्रकार घ्यावेसे वाटतात, त्याच प्रमाणे हिवाळ्यात गरम पदार्थ घ्यावेसे वाटतात . जसे उन्हाळ्यात आईस्क्रीम, थंडगार उसाचा रस तसेच हिवाळ्यात गरम गरम सूप व अन्य उष्ण पदार्थांचे सेवन आपल्याला करावेसे वाटते जेणेकरून शरीराचे तापमान राखण्यास मदत होते.

हिवाळ्यामध्ये आपल्याला  आहाराकडे लक्ष देणे खूप गरजेचे आहे . आपण कसा आहार घेतला पाहिजे जेणेकरून तो आपल्याला बाधणार नाही.  शक्यतो स्निग्ध आहार घेतला पाहिजे हिवाळा म्हणजे थंडी.  थंड वातावरणात मुळे या दिवसात शरीराला उष्मांकाची गरज असते म्हणून रोजच्या आहारात उष्ण घटकांचा समावेश जरूर करावा. हा आहार उष्णते बरोबर शरीराला ऊबही देईल. शरीरामध्ये उष्णता निर्माण होणे गरजेचे आहे गरम गरम तळलेल्या पदार्थांमुळे नाही,तर आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या अन्नपदार्थांच्या वापरातून आपण  थोड्या प्रमाणात प्रोटीन यामध्ये रिप्लेस करू शकतो.

आपण मसाल्याच्या पदार्थांचा विचार करू या मोहरी, हळद, हिंग ,लसूण, काळीमिरी, ओवा, तमालपत्र, लवंग, जायफळ ,दालचिनी या सर्व पदार्थांचा वापर आहारात जरूर करावा.  चहा मधून मुलांमध्ये सूपमध्ये याचा वापर आपण करू शकतो.

गहू, बाजरी, नाचणी या धान्यांचा वापर करावा.  त्याचप्रमाणे हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्या मेथी, मटार, गाजर, शेवग्याच्या शेंगा, पडवळ यासारख्या भाज्यांचा आहारात समावेश असावा मेथीची भाजी तर उत्तम डाळ मेथी ,थेपले ,मुटके, पराठे करू शकता.  त्याचप्रमाणे कुळीत, चवळी, मटकी ,मसूर यासारख्या कडधान्यांचा वापर आवर्जून करावा हिवाळ्यामध्ये पचनशक्‍ती उत्तम असते त्यामुळे शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या सुका मेव्याचा आहारात समावेश असावा.  जसे की ,बदाम, अक्रोड, काजू ,चारोळी ,अंजीर घ्यावेत तिळाचा आहारात समावेश जरूर करावा तिळाची चटणी तिळाचे लाडू तिळाची चिक्की स्वरुपात आपण घेऊ शकतो सुखाने यामध्ये ओमेगा -३ त्याचप्रमाणे विटामिन असल्यामुळे शरीराला त्याचा फायदाच होतो भरपूर आयरन देणाऱ्या आणि वाचा आहारात समावेश असावा अळीवाचे लाडू किंवा खीर करून आहारात वापरू शकता डिंकाचे लाडू त्याचप्रमाणे मेथी, शेपा चे लाडू आरोग्यासाठी उत्तम.

हिवाळ्यामध्ये पाण्याचा in-tech एकदम कमी होतो.  मात्र तसे होऊ देऊ नये पाणी कमी पिणे पिले तर पचनशक्तीवर परिणाम होतो.  त्याचप्रमाणे आळशीपणा सुद्धा येऊ शकतो . फार थंड पाणी पिण्याची  इच्छा होत नाही ,म्हणून कोमट पाणी घ्यावे त्याचप्रमाणे सूप किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या काढ्या चा वापर करावा अशा प्रकारे या ऋतू मध्ये मिळणाऱ्या फळे भाज्या वेगवेगळे धान्य, कडधान्य त्यांचा आहारात समावेश करावा तरच  आपण आपले आरोग्य नक्कीच चांगले ठेवू शकतो.

या सर्व पदार्थांचा वापर करून वेगवेगळ्या रेसिपीज आपण यापुढील भागात तपासून पाहूया. 

अनुपमा वैभव जोशी - 9404318875  (आहारतज्ञ्)

* Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

* Diploma in Nutrition and Health Education 

* Diploma in Yog Shikshak       



Post a Comment

0 Comments