बाळ बोठेच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  बाळ बोठेच्या  विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल 


वेब टीम नगर :  रेखा जरे हत्याकांडातील सूत्रधार पत्रकार बाळ   बोठे याच्या विरोधात नगर शहरातील एका विवाहित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात काल दि.२७ रोजी  विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

खूनासह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने बोठे याच्या अडचणीत भर पडली आहे. बोठे याने राहत्या घरी येऊन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत सदर महिलेने म्हटले आहे. ३० नोव्हेंबर  रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव घाट परिसरात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली होती. बोठे याने सुपारी देऊन हे हत्याकांड घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. बोठे मात्र फरार असून गेल्या २५ दिवसांपासून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.



Post a Comment

0 Comments