“रेखा जरे हत्याकांड प्रकरणी संपूर्ण नगर जिल्हा गप्प का “?.....अँड सुरेश लगड

 “रेखा जरे हत्याकांड प्रकरणी संपूर्ण नगर जिल्हा गप्प का “?.....अँड सुरेश लगड

वेब टीम नगर : बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणात पोलीसांना सहा आरोपी निष्पन्न  झाले पैकी पाच आरोपींना अटक केली , मात्र सहावा आरोपी बाळ ज. बोठे हा सदर गुन्हयात मुख्य सुत्रधार असल्याचे पोलीसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.एका महिलेचा खुन होतो.त्याबाबत कोणीच काही बोलायला तयार नाही. अहमदनगर जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा म्हणून स्वातंत्र्योत्तर काळापासून ओळखला जातो. अनेक चळवळींचे उगमस्थान म्हणून याच जिल्हयाला ओळखले जाते ते कामगारांचे आंदोलन असो, शेतकऱ्यांचे आंदोलन असो,जिल्हयाच्या या चळवळीची देशभरात नगरी पॅटर्न म्हणून अनोखी ओळख आहे. परंतू याच जिल्हयाला कुणाची नजर लागली. की काय ? एरवी साधी टाचणी जरी पडली तरी संपूर्ण जिल्हा आंदोलनाने दणाणुन सोडणाऱ्या संघटना, पक्ष, कार्यकर्ते, पुढारी कुठे अचानक गायब झाले. याचे उत्तर मात्र अनाकलनीय आहे. नगर जिल्हयात एका माहिला कार्यकर्त्याचा कट कारस्थान रचून निर्घृण खुन होतो आणि अचानक सर्व चळवळीतील कर्ती धर्ती माणस गप्पगार होतात यामागे हेतु काय ? हे मात्र कळत नाही. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार बाळ ज.बोठे गेले ३-४ आठवडयांपारून फरार आहे.एखाद्या अट्टल गुन्हेगाराप्रमाणे त्याला शोधणे पोलीसांची डोकेदुखी ठरली जाते. खुनासारख्या गुन्हयातील फरारी आरोपी बाळ ज. बोठे हा कार्यक्षम अशा पोलीस दलास सापडत नाही, यामागे अशी कोणती राजकीय शक्‍ती उभी आहे का ? आता याचाही पोलीसांनी शोध घेण्याची गरज निर्माण झाली आहे. परंतू. माझी अशी खात्री आहे की, हा मुख्य. सुत्रधार नक्कीच पोलीसांचे हाती लागेल. मुख्य सुत्रधाराचा मित्र डॉ. निलेश शेळके

यास मोठया शिताफीने ताब्यात घेतल्याने त्याचेकडून या मास्टमाईड फरार आरोपीची माहिती मिळू शळते. एक सामाजिक भ्रावनेतुन मी हा प्रश्‍न विचारीत आहे.  




Post a Comment

0 Comments