नगर बुलेटीन २६-१२-२०२०

 नगर बुलेटीन २६-१२-२०२०


केंद्र सरकार जनतेच्या , शेतकर्याचच्या हिताचे निर्णय घेत आहे 

 खा.डॉ.सुजय विखे : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना शहर भाजपाच्यावतीने श्रद्धांजली

    वेब टीम  नगर : आपल्या नेतृत्व, कर्तुत्व व वक्तृत्वामुळे स्व.अटलबिहारी वाजपेयी यांना  संपूर्ण जग ओळखते.  राजकारणाला प्राधान्य न देता देशाचा विचार करत विकासाला प्राधान्य देत त्यांनी काम केले आहे. आजचे केंद्र सरकार हे त्यांची जयंती सुशासन दिन म्हणून साजरी करत आहे. शेतकर्यां्साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकार जनतेच्या व शेतकर्यांरच्या हिताचे निर्णय घेत आहे. शेतकर्यां च्या खात्यामध्ये १९ हजार कोटी जमा केले आहेत. केंद्र शासनाने शेतकरी कल्याण योजना राबविली. शेतकर्यांठचे कल्याण करण्यासाठीच केंद्र सरकार काम करत आहे. परंतु राज्य शासन केंद्राच्या प्रत्येक योजनेला विरोध करत आहे. त्यासाठी भाजप म्हणून आम्ही शेतकर्यां साठीच्या योजना प्रत्येक घराघरात पोहचवू, असे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे यांनी केले.

      स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतनिमित्त शहर जिल्हा भाजपाच्यावतीने गांधी मैदान येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी खासदार डॉ.सुजय विखे, ज्येष्ठ नेते अच्युतराव पिंगळे, वसंत लोढा, सुनिल रामदासी, अनिल गट्टाणी, अनिल सबलोक, उपमहापौर मालनताई ढोणे, महिला बालकल्याण सभापती लता शेळके, महेश नामदे, अजय चितळे, तुषार पोटे, रविंद्र बारस्कर आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणाले, सुशासनामध्ये पहिली बांधिलकी ही लोकांशी असली पाहिजे. सरकारी योजनांबाबत, अंमलबजावणीही सरकारी अधिकार्यांशकडून होत असते. परंतु ही नोकरशाही अनेकदा झारीतल्या शुक्राचार्यासारखे काम करत असते. केवळ सरकार लोकाभिमुख असून चालणार नाही तर अंमलबजावणी करणारे प्रशासन लोकाभिमुख असले पाहिजे.  सुशासनाची एक बाजू म्हणजे सरकार व दुसरी बाजू म्हणजे प्रशासन असते. लोककल्याणकारी राज्याचा पाया हा छत्रपती शिवाजी महाराजांनी घातला आहे. हीच संकल्पना व आदर्श घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करत आहेत.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक नरेंद्र कुलकर्णी यांनी केले तर सूत्रसंचालन महेश नामदे यांनी केले. आभार तुषार पोटे यांनी मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष जगन्नाथ निंबाळकर, नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, संगीता खरमाळे, संतोष गांधी, शिवाजी दहिंहडे, सुनिल पंडित, जिल्हा सरचिटणीस अॅचड.विवेक नाईक, महेश नामदे, तुषार पोटे, चिटणीस गिता गिल्डा, विलास नंदी, अविनाश साखला, ऋग्वेद गंधे, मिडिया प्रमुख अमित गटणे, आदेश गायकवाड, सुबोध रसाळ, अमोल निस्ताने, नगरसेवक रविंद्र बारस्कर, उदय कराळे, मनोज दुलम, शुभांगी साठे, गणेश नन्नवरे, अजय चितळे, मयुर ताठे, मंडल अध्यक्ष पंकज जहागिरदार, अजय चितळे, वसंत राठोड आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी अनिल गट्टाणी, वसंत लोढा, सचिन पारखी, अच्युतराव पिंगळे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी भगवतगीतेचे पठण करुन गीतेचे वाटप सर्वांना करण्यात आले. तसेच सुशासन दिनानिमित्त शहर भाजपाच्यावतीने पांजरापोळ गो-रक्षण संस्थेत चारा वाटप करण्यात आला.

     यावेळी साहिल शेख, मुकुंद वाळके, मयुर जोशी, उमेश खांडेकर, केशव कुलकर्णी, लक्ष्मीकांत तिवारी, योगेश मुथा, आकाश सोनवणे, राकेश भाकरे, राजू मंगलारप्, कालिंदी केसकर, गुणाली मुथा, गारुडकरसर, प्रणव सरनाईक, हुजेफा शेख, राजेंद्र सातपुते, डॉ.विलास मढीकर, किरण जाधव, ज्ञानेश्व र धिरडे, अजित कोतकर, किशोर कटोरे आदि उपस्थित होते.  यावेळी प्रद्युन्य जोशी, मयुर जोशी, केशव कुलकर्णी, प्रविण भालेराव आदिंनी गीता पठण केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

जिल्हाध्यक्षपदी मोहंमद समी शेख तर सचिव शेख मोहंमद मुजीब

    वेब टीम  नगर : शिक्षक भारती संघटनेची बैठक नुकतीच राज्य सचिव सुनिल गाडगे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याप्रसंगी जिल्हा कार्यध्यक्ष बाबा लोंढे, इलियास तांबोली, मुख्याध्यापक खलील शेख, रफिया खान, एटीयुचे चेअरमन नज्जू पहेलवान, फिरोज खान आदिं मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्य अध्यक्ष मुश्ताक पटेल यांनी या बैठकीस ऑनलाईन मार्गदर्शन केले.  या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन शिक्षक भारती उर्दू संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. ती पुढीलप्रमाणे -

     जिल्हाध्यक्ष - मोहंमद समी शेख, जिल्हा सचिव - शेख मोहंमद मुजीब, उपाध्यक्ष शेख अकिल अहमद, मुन्नवर खलील (संगमनेर), मोहंमद तन्वीर (श्रीरामपूर), कोषाध्यक्ष - खान इमरान अय्युब, सहसचिव - खान नजीब नुरईलाही, पठाण अरबाज (श्रीरामपूर), मानद सचिव - मुन्नवर हुसेन, खजिनदार - अतिक शेख कादर (कोल्हार), महिला प्रतिनिधी - इनामदार गुलनाज, मार्गदर्शक - डॉ.प्रा.सलाम सर, जाकीर सय्यद, अबुनसर सैय्यद, शेख अशफाक अहमद.

     याप्रसंगी मार्गदर्शन करतांना राज्य सचिव सुनिल गाडगे म्हणाले, आज शिक्षकांचे अनेक प्रश्नस आहेत; ते सोडविण्यासाठी संघटन महत्वाचे आहे. शिक्षकांच्या प्रश्नांलसाठी शिक्षक भारती संघटना शासनाकडे वेळोवेळी दाद प्रसंगी आंदोलने करुन ते सोडवत आहेत. अल्पसंख्यांक संस्था व शिक्षकांचे विशेषत: उर्दू माध्यमांबाबत शासनाचे उदासिन धोरण असून, त्यासाठी संघटीत लढा देण्याची गरज आहे. यासाठीच नवीन कार्यकारिणी उर्दू शिक्षकांचे प्रश्नच सोडविण्यासाठी पुढाकार घेईल. त्यास शिक्षक भारती संघटनेचे राज्य व जिल्ह्यातील पदाधिकारी सहकार्य करतील, असे सांगितले.

     याप्रसंगी नूतन जिल्हाध्यक्ष मोहंमद समी शेख म्हणाले, शिक्षक भारती संघटनेच्या माध्यमातून उर्दू शाळा व शिक्षकांचे प्रलंबित मागण्या सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्रित लढा देण्याची गरज आहे. संघटनेने जिल्हाध्यक्षपदाची जी जबाबदारी दिली ती सर्वांना बरोबर घेऊन पार पाडू. उर्दू शाळा व शिक्षकांच्या प्रश्नांंना आपले प्राधान्य राहील, असे सांगितले.

     कार्यक्रमाचे प्रास्तविक खान नजीब यांनी केले तर सूत्रसंचालन इमरान खान यांनी केले. शेवटी शेख अकिल यांनी आभार मानले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर शिरसाठ यांची निवड


वेब टीम नगर  : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी इंजि. सुधिर चंद्रहास शिरसाठ यांची निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दिदी दुहन यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आलेली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व माजी खा. तथा ठाणे जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेशप्रवक्ते आ. अमोल मिटकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे व नाशिक विभागीय अध्यक्ष चिन्मय गाढे यांनी हे नियुक्तीपत्र  सन्मानपूर्वक प्रदान केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज दादा चव्हाण, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दिदी दुहन यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सर्व विभागीय अध्यक्ष उपस्थित होते. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड करून मी पाठीमागील दीड वर्षापासून  राबविलेल्या सर्व सामाजिक उपक्रमाचा व पक्षाहितासाठी केलेल्या कामाचा सन्मान केला आहे.  भविष्यात सर्वसामान्य जनतेसाठी अधिक जोमाने व ताकदीने काम करता यावे यासाठी पक्षाने माझी नियुक्ती केली. त्यामुळे आता माझी समाजाप्रती असणारी जबाबदारी अधिक वाढली आहे. याची देखील जाणीव मला पक्षाने करून दिली आहे. पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून येणाऱ्या काळात ८०% समाज कारण व २०% राजकारण या तत्वानुसार मी प्रामाणिकपणे काम करणार आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस पदाच्या माध्यमातून राज्यभरातील माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांच्या प्रश्नावर काम करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्यभरातील विद्यार्थ्यांचे सर्व प्रश्न समजावून घेण्यासाठी मी लवकरच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांसोबत, पक्ष श्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करणार आहे असे इंजि. सुधिर शिरसाठ म्हणाले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी पुस्तिका मार्गदर्शक ठरेल

शंभुराजे नवसुपे : शिवराष्ट्र सेनेच्यावतीने शासकीय योजना पुस्तिकेचे प्रकाशन

    वेब टीम  नगर : शिवराष्ट्र सेना पक्षाच्या  एकदिवस कार्यकर्ता मेळावा नुकताचपार पडला. या मेळाव्यात पक्षाच्यावतीने काढण्यात आलेल्या शासकीय योजनांचे पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे, जिल्हाध्यक्ष अक्षय कांबळे, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय पितळे, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब करपे,  ज्येष्ठ पदाधिकारी भैरवनाथ खंडागळे, राधाकिसन  कुलट, आदि उपस्थित होते.

     यावेळी शिवराष्ट्र सेना युवा प्रमुख शंभुराजे नवसुपे यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ संबंधिताना मिळविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिवराष्ट्र सेनेच्यावतीने या शासकीय योजनांची माहिती पुस्तिका तयार करण्यात आली असून, त्याद्वारे शेतकरी, महिला, विद्यार्थी छोटे-मोठे व्यावसायिक यांच्याकरीत ज्या योजना आहेत, त्यांची माहिती, कर्ज, सबसिडी, संबंधित कार्यालये आदिंची माहिती एकत्रित करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पुस्तिकेद्वारे योजनेचा लाभ मिळण्यास सहाय्य होणार आहे. युवा कार्यकर्त्यांनी याबाबत जनजागृती करुन या योजना वंचित घटकांपर्यंत पोहचविण्याचे काम करावे व त्याचा लाभ संबंधितांना मिळवून द्यावा, असे आवाहन केले.

     याप्रसंगी पक्षाध्यक्ष संतोष नवसुपे म्हणाले, शिवराष्ट्र पक्ष हा सर्वसामान्यांचे प्रश्नव सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. या पक्षात अनेक लोक जोडले जाऊ राहिले आहेत. विविध आघाड्यांच्या माध्यमातून समाजातील प्रश्न  सोडविण्यासाठीचे प्रयत्न केले जात आहेत. आता शासकीय योजनांची पुस्तिकाचे प्रकाशन करुन लाभार्थ्यांना दिशा देण्याचे काम पक्षाच्यावतीने होईल, असे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची महिलेकडून भिंगारच्या उद्योजकाला धमकी

 जिल्हाधिकार्यांकना निवेदन  : धमकी देणार्या  महिलेवर कारवाई करण्याची मागणी

वेब टीम नगर : भिंगार शहरातील उद्योजक असलेले सुमित कुमार संतोष प्रसाद यांच्या एजन्सी समोर एका महिलेने अतिक्रमण केले आहे. सदरचे अतिक्रमण काढून घेण्याची विनंती केली असता, त्या महिलेने खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी सदर महिलेवर कारवाई करण्याची मागणी उद्योजक सुमित कुमार यांनी निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

सुमित कुमार संतोष प्रसाद यांची भिंगार येथील विजय लाईन चौकात एस.के. इंटरप्राईजेस नावाची एजन्सी आहे. त्यांच्या एजन्सीच्या समोरील मोकळ्या जागेत एका महिलेने अनाधिकृत अतिक्रमण केले आहे. सदर महिलेस अतिक्रमण काढण्यास वारंवार विनंती केली असता, सदर महिलेने उद्योजक सुमित प्रसाद यांना मला जातीवाचक शिवीगाळ केली व माझ्यावर बळजबरी केली अशा खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकण्याची धमकी देत आहे. सदर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस ठाणे भिंगार कॅम्प येथे गेले असता त्यांनी सदर प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. या प्रकरणात न्याय मिळण्यासाठी उद्योजक सुमित कुमार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे धाव घेऊन निवेदन दिले.

     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत पवार यांनी केले तर आभार ओमकार जाधव यांनी मानले. याप्रसंगी प्रशांत देठे, अनुप गांधी, राजू चावक, अशिष म्हस्के, धनंजय डोके, अजय अपुर्वा, माऊली बादाडे, नवनाथ नागरगोजे, विवेक डफळ, धनंजय डोके, साहिल सोनटक्के, ऋषी शिंदे, निलेश जायभाय, विजय जगताप आदि उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा गावचा आत्मा 

शीलकुमार  जगताप  : आगडगाव व रांजणीतील ग्रामस्थांना वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे धडे

नाबार्ड व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचा उपक्रम

वेब टीम नगर : ग्रामीण विकासामध्ये स्वच्छता हा कुटुंबाचा व गावचा आत्मा आहे. गावातील प्रत्येक नागरिकाने आपले गाव व कुटुंब स्वच्छ ठेवणे कर्तव्ये व जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाव स्वच्छ ठेवून गावाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी शौचालय उभारुन नयमितपणे त्याचा वापर करणे, सार्वजनिक परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी शीलकुमार जगताप यांनी केले.

ग्रामीण स्वच्छतेस प्रोत्साहन देऊन लोकांचा स्वच्छ भारत अभियानात सहभाग वाढवून हे अभियान यशस्वी करणे व  गावाचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने नॅशनल बँक फॉर अॅाग्रीकल्चर अॅिण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) व बॉस्को ग्रामीण विकास केंद्र केडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नगर तालुक्यातील आगडगाव व रांजणी येथे एक दिवसीय ग्रामीण स्वच्छता जनजागृती अभियान कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी जगताप बोलत होते. या कार्यशाळे जिल्हा अग्रिनी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर, प्राथमिक आरोग्य केंद्र देवगावचे डॉ. मोरे, आत्मा (अॅलग्रीकल्चर टेक्नोलॉजी मॅनेजमेंट एजन्सी) डोईफोडे व बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअॅयब्रिओ यांनी ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून मार्गदर्शन केले.

जनतेमध्ये स्वच्छतेच्या सवयी निर्माण होऊन, ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुधारावे या उदेशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेणे करून जी कुटुंबे स्वच्छ भारत अभियानापासून वंचित राहिलेली आहेत, ज्यांनी अद्याप शौचालय बांधलेले नाहीत, बांधले असले तरी पाणी व इतर कारणासाठी वापर करत नाहीत, अशा कुटुंबांना या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रोत्साहित करुन हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात आले. या कार्यशाळेत गावातील प्राधान्यक्रमे निवडलेल्या १३५ वंचित कुटुंबांनी सहभाग घेतला.

नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी जगताप यांनी नाबार्डच्या विविध विकास योजनांची माहिती दिली. जिल्हा अग्रिनी बँकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर यांनी शेतकरी व सामान्य जनतेसाठी उपलब्ध असलेल्या बँकाच्या विविध योजनांची माहिती दिली. प्राथमिक आरोग्य केंद्र देवगावचे डॉ. मोरे यांनी निरोगी आरोग्यासाठी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डीअॅरब्रिओ यांनी नाबार्डच्या माध्यामातून पाणलोट क्षेत्रविकास कार्यक्रमामुळे गावातील शेती व उपजीविका संदर्भात झालेल्या कामामुळे सामाजिक व आर्थिक विकास साधला गेला. सध्या सुरु असलेल्या ग्रामीण स्वच्छता अभियानातून नक्कीच गाव स्वच्छ व आरोग्यदायी होईल अशी आशा व्यक्त केली व ही मोहीम यशस्वी करण्यास ग्रामस्थांना पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले. या कार्यशाळेसाठी आगडगावचे सरपंच मच्छिद्र कराळे, उपसरपंच किसन शिरसाठ, रांजणीचे सरपंच बाळासाहेब चेमटे, उपसरपंच विजय लिपने, रांजणी सोसायटीचे ऊपाध्यक्ष अशोक लिपने व दोन्ही गावातीआल ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे दिनेश शेरकर यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे कर्मचारी व गावातील ग्रामस्थांनी केले होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोठी येथे ख्रिसमस निमित्त गरजूंना ब्लॅकेटचे वाटप

जवान मित्र मंडळ : सामाजिक उपक्रमाचे ३४ वे वर्ष

वेब टीम नगर : ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यां समवेत साजरा करण्याच्या उद्देशाने कोठी येथील जवान मित्र मंडळाच्या वतीने थंडीच्या पार्श्वसभूमीवर गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे हे ३४ वे वर्ष असून, माजी नगरसेवक रुपसिंग कदम यांच्या प्रेरणेने दरवर्षी ख्रिसमसला या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते.

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते गरजूंना ब्लॅकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी द.स. पारगे, उबेद शेख, बाळासाहेब भुजबळ, माजी नगरसेविका शैला कदम, माजी नगरसेवक रुपसिंग कदम, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय लोखंडे सर, नगरसेविका पारगे, कादिर शेख, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक अध्यक्ष साहेबान जहागीरदार, शहानवाझ शेख, हुसेन शेख, विजय साठे, राजू गायकवाड, हाजी फिरोज खान, नदिम मोमीन, श्रीकांत पवार आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सुख, शांती, समृध्दीसाठी व कोरोनाच्या संकट दूर होण्यासाठी प्रभू येशु चरणी प्रार्थना करण्यात आली. आमदार संग्राम जगताप म्हणाले की, मानवसेवा हीच ईश्व्रसेवा आहे. दीन-दुबळ्यांना मदत केल्याने जीवनात सुख-समृध्दी नांदत असते. गरजूंना आधार देण्यासाठी माजी नगरसेवक रुपसिंग कदम विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात. ख्रिसमस निमित्त सलग ३४ वर्ष ब्लॅकेट वाटपाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. वाढत्या थंडीची तीव्रता लक्षात घेवून जवान मित्र मंडळाने घेतलेल्या उपक्रमातून गरजूंना ऊब मिळणार आहे. प्रभु येशु ख्रिस्तांनी दीनदुबळ्यांवर प्रेम करण्याचा दिलेला संदेश या उपक्रमाने आचरणात आला आहे. ख्रिसमस सणाचा आनंद दीनदुबळ्यांच्या सेवेने द्विगुणीत झाला असल्याचे संजय लोखंडे यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments