अण्णांच्या भूमिके कडे सगळ्यांचे लक्ष

 अण्णांच्या  भूमिके कडे सगळ्यांचे लक्ष 

वेब टीम राळेगणसिद्धी : आज दुपारी कृषी विधेयकाची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे एक शिष्ठ मंडळ जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला आले होते. त्यात भाजप चे जेष्ठ नेते व विधान सभेचे माजी सभापती आमदार हरीभाऊ बागडे, खा.डॉ. भागवत कराड , प्रा. भानुदास बेरड , सुनील थोरात आदींचा या शिष्ट मंडळात समावेश होता. 

दुपारी जेष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांचीही भेट घेऊन त्यांना कृषी विधेयकाची माहिती दिली. तसेच कृषी विधेयकावर प्रसिद्ध करण्यात आलेली  पुस्तिका देऊन हे विधेयक शेतकरयांच्या हिताचे असल्याची भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न केला तसेच अण्णांनी या पुस्तिकेचा अभ्यास करून मगच आपली कृषी आंदोलनाची भूमिका ठरवावी अशी अण्णांना विनंती केल. दरम्यान दोन दिवसांपासून  दिल्ली व हरयाणातील  शेतकरी राळेगण सिद्धीत येऊन अण्णांना आंदोलनात सहभागी होण्यासाठी आग्रह धरत आहेत.त्यामुळे आता अण्णा नेमकी काय भूमिका घेतात यावर साऱ्यांचे लक्ष लागून आहे.     

Post a Comment

0 Comments