जळगावात तहसीलदारासह, मंडल अधिकारी आणि तलाठी लाचलुचपतच्या सापळ्यात
वेब टीम जळगाव : तक्रारदाराने त्याच्या पत्नीच्या नावाने सन २००२ मध्ये बोदवड तहसीलच्या हद्दीत शेत खरेदी केली होती. या शेतीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर त्याच्या पत्नीचे नाव लावण्यात आले होते. कालांतराने शेतीच्या उताऱ्यावर मूळ मालकाचे नाव आल्याने तक्रादाराने मंडळ अधिकारी यांना भेटून पुन्हा शेतीच्या ७/१२ च्या उताऱ्यावर त्याच्या पत्नीचे नाव लावले व ७/१२ चा उतारा ताब्यात घेतला सदर उताऱ्या बाबत तहसीलदार बोदवड यांनी हरकत घेऊन संबंधित पुरावा देण्याची नोटीस काढली. व काढलेली नोटीस रद्द करण्याच्या मोबदल्यात आरोपी क्र १ हेमंत भागवत पाटील (वय ४० तहसीलदार , बोदवड , रा. भरडी , ता. जामनेर जि.जळगाव ) च्या वतीने आरोपी २ संजय झेंडू शेरनाथ (वय ४७ मंडल अधिकारी , बोदवड , रा.प्रभाकर हॉल जवळ , श्रीराम निवास अपार्ट . ता. भुसावळ , जि . जळगाव ) व आरोपी क्र ३ नीरज प्रकाश पाटील ( वय ३४ तलाठी, बोदवड,रा. हेडगेवारनगर,बोदवड,जि.जळगाव ) यांनी तक्रारदार कडून ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती २ लाख रुपये आरोपी क्र २ यांनी १८-१२-२०२० रोजी पंचांसमोर स्वीकारले.
डी.वाय.एस.पी . गोपाल ठाकूर पो.नि संजोग बच्छाव , पो.नि निलेश लोधी , स.फौ. रवींद्र माळी . पो.हे.कॉ .अशोक अहिरे , सुनील पाटील , रवींद्र घुगे , सुरेश पाटील , पोना. मनोज जोशी , सुनील शिरसाठ , जनार्दन चौधरी , पोकॉ . प्रवीण पाटील , महेश सोमवंशी , नासिर देशमुख ,ईश्वर धनगर यांनी मार्गदर्शक पोलीस अधीक्षक ला.प्र.वि नाशिक परिक्षेत्र सुनील कडासने , अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे , पोलीस उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांच्या मार्गदर्शन खाली यशस्वीरीत्या सापळा लावून कारवाई केली.
0 Comments