बाळ बोठेचा अटकपूर्व जामीन नामंजूर
वेब टीम नगर : रेखा जरे हत्या कांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याचा अटकपूर्व जामीन आज जिल्हा न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता बाळ बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.
दरम्यान ह्या अटक पूर्व जामिनावर कालच दोन्ही बाजूनी युक्तिवाद कारण्यातर आला होता त्यात बाळ बोठे याच्या वकिलाने पूर्वीच्या रागातून भिंगारदिवे याने बाळ बोठे याचे नाव घेतले असून या व्यतिरिक्त अन्य कोणताही ठोस पुरावा पोलिसांकडे नाही असे म्हंटले होते. तर त्या युक्तिवादाला उत्तर देतांना ३० नोव्हेम्बर रोजी घडलेल्या जरे यांच्या हत्येच्या वेळी बोठे आणि भिंगारदिवे एकमेकांच्या संपर्कात होते.त्या पूर्वी आणि नंतरही ते एकमेकांच्या संपर्कात असल्याचे पुरावे पोलिसांकडे आहेत असा युक्ती वाद सरकारी वकील सतीश पाटील यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्या.एम.आर.नातू आज यांनी पर्यंत निकाल राखून ठेवला होता .
आज निकाल देतांना बाळ बोठेचा जमीन अर्ज नामंजूर केल्याचा निकाल न्यायालयाने दिला. हत्याकांड झाल्यापासून दुसऱ्या दिवशी रात्रीच पोलिसांना गुंगारा दिलेला बाळ बोठे अद्याप फरार असून त्याला जामिना साठी खंडपिठात धाव घ्यावी लागणार आहे.
0 Comments