भिंगारच्या लॉरेन्स स्वामीला अटक
वेब टीम नगर - काही दिवसांपूर्वी भिंगार पोलिसात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्ह्यातील आरोपी हा लॉरेन्स स्वामी असल्याने पोलीस सकाळी ७ वाजताच स्वामी रेसिडेंसी या त्याच्या घरावर फौज फाट्यासह गेले असता पोलिसांची कुणकुण लागल्याने त्याचे घराचे दरवाजे आतून बंद केले. अकहर ८ तासांनंतर पोलिसांनी बंगल्याचा दरवाजा तोडून आरोपीस ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याला वारंवार लाऊड स्पीकर वरून बाहेर येण्याचे आवाहन केले मात्र न्यायालयातून अटक पूर्व जामीन मिळ्वण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या लॉरेन्स ने घराबाहेर येण्याचे टाळले. अखेर पोलीस उपाधीक्षक विशाल ढुमे यांच्या पथकाने बंगल्याचा दरवाजा तोडून लॉरेन्सला अटक केली.
काही दिवसांपूर्वी भिंगार पोलीस ठाण्यात एका माजी आमदाराने लॉरेन्स च्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. मात्र खोटा गुन्हा दाखल केल्याकंच दावा लॉरेन्स याने केला होता.
0 Comments