शेतकऱ्याच्या हाकेला प्रतिसाद द्या : संजय राऊत

 शेतकऱ्याच्या हाकेला प्रतिसाद द्या : संजय राऊत 

वेब टीम मुंबई : महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या उद्याच्या बंदला  पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भातील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करताना राज्यातील जनतेल आवाहन केलं आहे की 'उद्याचा बंद हा वेगळ्या प्रकारचा बंद आहे. यात राजकीय पक्षांचा सहभाग असला तरी हा राजकीय बंद नाही. गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर थंडी, वारे व सरकारच्या दडपशाहीची पर्वा न करता जे शेतकरी बांधव बसले आहेत, त्यांना पाठिंबा देण्यासाठी हा बंद आहे,' असं राऊत म्हणाले.

आज शेतकऱ्यांनी दिलेल्या हाकेला जनतेनं स्वयं स्फूर्तीने साथ द्यावी 'लॉकडाऊनच्या काळात आपण सगळे घरात बसलेलो असताना एकटा शेतकरी राजा राबत होता.आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. त्यामुळं हा जनतेनं स्वेच्छेनं बंदमध्ये सहभागी व्हावं व बळीराजाच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करावी,' असं आवाहन त्यांनी केलं आहे.


Post a Comment

0 Comments