मनपाची थकबाकी वसुलीसाठी शास्ती माफी जाहीर

 मनपाची थकबाकी वसुलीसाठी शास्ती माफी जाहीर 

वेब टीम नगर : नोव्हेंबर महिन्यात दिलेल्या मालमत्ता करातील शास्ती माफीस मिळालेला प्रतिसाद पाहता आणखी एक महिना शास्ती माफीस मुदत वाढ देण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० पर्यंत ७५ टक्के तर १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबर अखेर ५० टक्के शास्ती माफी जाहीर करण्यात आली आहे. तरी या शास्ती माफीचा थकबाकी दरांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे आणि आयुक्त श्रीकांत मायकलवर यांनि केले आहे. 

शास्ती माफी हि फक्त १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२० या एक महिन्याच्या कालावधी साठीच लागू राहील या कालावधीत महापालिकेच्या  प्रभाग  कार्यालयाकडील वसुली विभाग सोमवार ते शनिवार सकाळी ९. ३० ते सायं ६ पर्यंत  तर रविवार व सुट्टीच्या दिवशी सकाळी ९. ३० ते दुपारी २ वाजे पर्यंत भरणा स्वीकारण्यासाठी सुरु राहतील तरी थकबाकीदार मालमत्ता धारक यांनी शास्ती माफीचा लाभ घ्यावा.या शास्ती माफी नंतरही जे मालमत्ता धारक कर भरणार नाहीत त्यांच्यावर जप्ती सारखी कारवाई करण्यात येईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी.    

Post a Comment

0 Comments