आरोग्य आहार
मिक्स वेज सोया पॅन केक
साहित्य : अर्धी वाटी सोयाबीन, १ वाटी तांदूळ , छोटा अर्धा चमचा मेथीदाणे, गाजर , पत्ता कोबी, मटार , स्वीट कॉर्न, आलं लसूण मिरची पेस्ट , मीठ, चीज ,चाट मसाला.
कृती: प्रथम सोयाबीन, मेथीदाणे आणि तांदूळ वेगवेगळे ४ ते ५ तासांसाठी शिजत घाला परत मिक्सर मधून कडून ४ ते ५ तासांसाठी बाजूला ठेवणे. मीठ घालून चांगले मिक्स करु घेणे.
गाजर किसून घेणे , पत्ता कोबी बारीक चिरणे, मटार व स्वीट कॉर्न वाफवून घेणे . एका पॅन मध्ये तेल घेऊन त्यात आलेलसूण मिरची पेस्ट व सर्व भाज्या घालून वाफवून घेणे . नंतर एका पॅनमधे तेल घेऊन तयार पिठाचे छोटे पॅन केक घालणे. त्यावर तयार भाजी ठेऊन किसलेलं चीज पसरवणे. चाट मसाला भुरभुरवून झाकण ठेवणे. ए वाफ आल्यानंतर सॉस बरोबर सर्व्ह करणे.
अनुपमा वैभव जोशी - 9404318875
* Dietition and Nutrition
* B.Sc. in Food Science and Nutrition
* Diploma in Nutrition and Health Education
* Diploma in Yog Shikshak
0 Comments