क्रिस्टल हॉस्पिटल मध्ये धन्वंतरी जयंती उत्साहात साजरी
स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकल्प सर्वांनी करावा: डॉ. जितेंद्र ढवळे
वेब टीम नगर – भगवान धन्वंतरी यांनी दाखून दिलेल्या आरोग्यदायी मार्गावर सर्वांनी चालावे. त्यामुळे सर्वांचे आरोग्य सुधृढ राहून निरोगी जीवन सर्वांना जगता येईल. आजच्या धन्वंतरी जयंतीनिमित्त सर्वांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकल्प करावा, असे आवाहन क्रिस्टल हॉस्पिटलचे प्रमुख तज्ञ डॉक्टर जितेंद्र ढवळे यांनी केले.
झोपडी कॅन्टीन समोर नव्याने सुरु झालेल्या क्रिस्टल हॉस्पिटल मध्ये धन्वंतरी जयंतीनिमित्त धन्वंतरी देवतेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ. जितेंद्र ढवळे यांच्या हस्ते झाले. यावेळी हॉस्पिटल संचालक व मोहटा देवी देवस्थानचे विश्वस्थ डॉ. ज्ञानेश्वर दराडे, कांचन पालवे यांनी धन्वंतरी देवतेचे पूजन केले.
प्रास्ताविकात हॉस्पिटलची माहिती देतांना डॉ. ज्ञानेश्वर दराडे म्हणाले, क्रिस्टल हॉस्पिटल सुरु झाल्यापासून सामाजिक जाणीवेतून काम करतांना नगर शहरात करोणाचा सर्वात जास्त प्रादुर्भाव असतांना क्रिस्टल हॉस्पिटल मधून सर्वसामान्य व गरजू रुग्णांना आरोग्यदायी सुविधा मिळण्या. आता नॉन कोविड विभाग सुरु झाला असून सर्व प्रकारच्या अत्यावश्यक व अत्याधुनीक वैद्यकीय सुवीधा रुग्णांना मिळत आहेत.
यावेळी गणेश फसले, विकास पारगावकर, विनायक बडे, संजीत घाडगे आदी उपस्थीत होते
0 Comments