दिवाळी विशेष
होय... जमीला परत येणार आहे...
दोन हजार पाच सालची गोष्ट महाराष्ट्रातून १५-१६ पत्रकारांचा अभ्यास गट काश्मीरच्या दौऱ्यावर होता. आमचा मुक्काम श्रीनगर मधल्या हीमॉल हॉटेलमध्ये होता. महाराष्ट्रात कडाक्याचा उन्हाळा असला तरी श्रीनगर मध्ये मात्र वातावरण अत्यंत आल्हाददायक होतं नगरमध्ये मे महिन्याच्या उन्हाने अंगाची काहिली व्हायची, मात्र श्रीनगर आठ-दहा अंशापर्यंत तापमान नगर ते श्रीनगर मध्ये वातावरणातील एवढ्या फरकाचे मला मनापासून अप्रूप वाटायचे.
सकाळी लवकर उठून फिरायला जायचा माझा शिरस्ता मी श्रीनगरमध्ये ही कायम ठेवला होता चार-पाच दिवसांच्या वास्तव्यात कधी खंड पडला नाही रोज सकाळी आणि रात्री जेवण ओळखल्यानंतर फिरायला जायचं असा दिनक्रम ,म्हणजे लष्करी जवानांनी तुम्ही समजता तेवढे हे फिरणं सुरक्षित नाही असं सांगूनही माझ्या करण्यात खंड पडला नव्हता.
एके दिवशी सकाळी मी दाल लेकवर रस्त्याने फिरत होतो, गुलोकन नावाच्या छोटेखानी दुकानात चहा प्यायला बसलो. तेव्हा मला सिगारेट ओढण्याची सवय होती. मात्र मला हवा असलेला ब्रँड त्या दुकानाचा मालक महंमद रफिक ओढत असल्याने गेल्या दोन-तीन दिवसात आमची चांगलीच गट्टी जमली. सिगारेट पिताना आमच्या चांगल्याच गप्पा रंगू लागल्या 'आप कहासे आए हो महंमद रफिक न मला पहिल्याच भेटीत विचारलं ,तर मीही अगदी मोकळेपणे महाराष्ट्रातून आल्याचं सांगून टाकलं. आपल्याकडच्या हवा पाण्याची विचारपूस मदत केली, तशी मीही त्याला काश्मीरच्या सद्यस्थिती बद्दल विचारलं तर 'कोई हमको तो बस मन शांती चाहिये,काश्मीरमे टुरिस्ट आयेंगे तो हमारा गुजारा चलेगा' असं म्हणत गाळून दोन कप चहा घेऊन आला मग मीही त्याला काश्मीर बद्दल हळू हळू बोलतं करायला सुरुवात केली.
मोहम्मद बोलता झाला. मी शेख अब्दुल्ला यांच्या विचारांना मानणारा माणूस आहे. आम्हाला पाकिस्तानशी काही देणे घेणं नाही स्वायत्तता हवी असं म्हणत त्याने स्वतःच आपलं अंतरंग उलगडायला सुरुवात केली. बोलण्याच्या ओघात जमीला- जमीला असा उल्लेख वारंवार होऊ लागला. त्याला जमीला बद्दल बोलतं केलं तो म्हणाला,' काय सांगू बडी दास्तां है मेरी जिंदगी ' त्याच्या बोलण्यात मला रस आहे हे त्यानं ताडलं आणि सांगू लागला पच्चीस साल पहले की बात है जर्मनी मधून काही पर्यटक काश्मीरला आले होते ,तेव्हा मी गाईडचे काम करत होतो त्या दहा-बारा जणांच्या समुहात दोन तीन जोडपी दोन-तीन पोरी होत्या त्यांच्यापैकीच एक नाकीडोळी दिसायला चुणचुणीत सुंदर मुलगी 'एरीक ',प्रत्येक पर्यटन स्थळी तिची प्रश्नांची सरबत्ती सुरु असायची, नाना गोष्टींबाबत विचारून मला भंडावून सोडायची. मग मीही तिला जर्मनीतल्या काही गोष्टी घटनांबद्दल विचारू लागलो. बर्लिनचा विषय निघाला कि ती हळवी व्हायची त्याकाळात बर्लिन शहर हिंसाचाराचा केंद्रबिंदू बनलं होतं जर्मनीच्या विभाजना अगोदरचा काळ असल्याने तेथे अराजक माजलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर काश्मीर म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्ग वाटत होता.तिला काश्मीर मनापासून भावलं..
महिनाभराच्या सहवासात ती मला आवडू लागली मी ही त्याला आवडायला लागल्याचं तर तिच्या अनेक कृतीतून दिसत होतं . ऐन तारुण्यातील आम्ही दोघं त्यातून नकळत आम्ही एकमेकात कधी अडकलो ते कळलंच नाही. आम्ही दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. माझी मंत्रालयातल्या काही अधिकाऱ्यांबरोबर चांगले संबंध असल्याने काश्मिरी नागरिकत्व मिळवून देण्यासाठी खटपट सुरू केली. आम्ही विवाहबद्ध झालो तेव्हापासून तिचं नाव बदललं ती 'जमीला' झाली तिच्याबरोबरचे पर्यटक जर्मनीला निघून गेले तसा आमचा संसार सुरू झाला.
जमीलाला मी गाईडचे काम करणं फारसं आवडत नसे, त्यापेक्षा प्रतिष्ठेचं काही काम करावं असं तिला वाटत असे तिने मला बेकरीचे प्रशिक्षण घेण्यासाठी विचारलं काहीशा उत्सुकतेपोटी मी ही तयार झालो. चांगल्या प्रशिक्षणासाठी जर्मनीला जावे लागणार होते. त्या दृष्टीने आमची खटपट सुरू झाली पासपोर्ट- व्हिसा या भानगडीत कराव्या लागणार होत्या, तसं मी रोजचे काम करून मिळालेल्या पैशात पासपोर्ट-व्हिसा मिळवण्याच्या तयारीला लागलो जर्मनीत वर्षभराचं प्रशिक्षण घेण्यासाठी आम्ही दोघे जर्मनीला गेलो. चांगल्या प्रशिक्षणामुळे माझाही हुरूप वाढला प्रशिक्षण पूर्ण झाल्याबरोबर आणि पुन्हा काश्मीरला आलो जमिनीलानं काखोटीला असलेला पैसा लावून अद्ययावत यंत्रसामग्री घेतली,आणि दाललेक समोरच एक बेकरी सुरू केली. तिचं नाव गुलोकन असं ठेवलं
गुलोकन म्हणजे घंटे सारखं एक वाद्य फिरवल्यानंतर त्यातून निर्माण होणाऱ्या मंजुळ नाद म्हणजे गुलोकन. हळूहळू नावाप्रमाणे गुलोकन बेकरीचे नाव व्हायला लागलं काश्मिरात येणाऱ्या पर्यटकांनी गुलोकन बेकरीला भेट दिली नाही तर त्यांनी पूर्ण काश्मिर पाहिलंच नाही एवढा लौकिक मिळवला.
गुलोकन बेकरी तेजीत असताना आम्ही निशांत बाग सारख्या उच्चभ्रू वस्तीत बंगला घेतला. दिमतीला मारुती कार आली संसारवेलीवर दोन फुलं ही उमलली सारं काही छान चाललं होतं. मात्र आता काश्मिरात ही स्वायत्ततेचं वारं वाहायला लागलं. जे. के. एल. एफ. सारख्या संघटना निर्माण व्हायला लागल्या त्यांना पाकिस्तानची फूस मिळाली, मग त्यांनी उपद्रव करायला सुरुवात केली. तश्या स्वायत्तता मिळवणाऱ्या अनेक संघटना अस्तित्वात आल्या. शेख अब्दुल्ला यांचे पुत्र फारुक अब्दुल्ला यांची संघटना होती हुररियात कॉन्फरन्स सारख्या संघटना निर्माण झाल्या आणि मीही नकळतपणे या चळवळीत जोडला गेलो . जे के एल च्या काही लोकांची उठ बस आमच्याकडे वाढली. मोहंमद आमची चार माणसं काही दिवसांसाठी तुझ्याकडे राहू देत तर कधी महंमद आमच्या या दोन माणसांना अमुक अमुक ठिकाणी सोडण्यासाठी गाडी दे असं सुरुवातीला विनंती आणि नंतर नंतर जबरदस्ती होऊ लागली . त्याचा आमच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला अतिरेकी कारवाया वाढायला लागल्या तशी आमची आर्थिक स्थिती डबघाईला येऊ लागली तिकडे जमिलाची चिडचिड वाढू लागली, ती अस्वस्थ होऊ लागली . जर्मनीतल्या अशांततेला कंटाळून मी जर्मनी सोडून तुझ्याबरोबर राहिले ,आता काश्मीर मध्ये ही तेच होणार असेल तर काय करायचं आपण या विचाराने ती उद्विग्न होऊ लागली. मी कशीबशी तिची समजूत घालत होतो मात्र ते फार काळ चालले नाही. दिवसेंदिवस काश्मीरमधील अशांतता वाढत गेली चळवळीने उग्र स्वरूप धारण केलं काही पर्यटकांची हत्या झाल्याने पर्यटकांची संख्या रोडावली काश्मीरमध्ये जास्तीत जास्त वेळ लागला हळू काश्मीर ची परिस्थिती पोलिसांच्या हाताबाहेर गेली. सैन्याचा वावर वाढला . का. श्मीर मध्ये जास्तीत जास्त वेळा कर्फ्यू राहू लागला. काश्मीरमधील पर्यटन व्यवसायाची वाताहात झाली एके दिवशी माझ्यात आणि जमिलात टोकाची भांडणं झाली, आणि आम्ही काश्मीर सोडून जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला.
जर्मनीत आता परिस्थिती निवळली होती. दोन युरोप एकत्र येण्याची स्थिती निर्माण झाली होती. काश्मीरच्या तुलनेत तिथे शांतता नांदत होती जमीला मी आणि आमचे मुलं जर्मनीत स्थिरस्थावर होऊ लागलो. मुलांचे शिक्षण जमीला मुळे मार्गी लागलं काखोटीला चार पैसे असल्यानं जगण्याची भ्रांत नव्हती, मात्र माझं मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं सतत भारताची आणि काश्मीरची ओढ लागून रहायची कधी एकदा काश्मीरला परत येईल असं वाटत राहायचं अखेर सहा महिन्यानंतर मी भारतात परत आलो. पुन्हा एकदा काश्मिरात नव्यानं सुरुवात करायची ठरवलं अवघड वाटत होतं कारण काश्मिरातील पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली होती. त्यामुळे साधं गाईड्चं काम करण्याचीही सोय नव्हती, एव्हाना बेकरीचा धंदाही बसला होता, आणि मुळात बेकरीची काम करायला लागणार मनुष्यबळ जरी उपलब्ध असलं तरी पर्यटक नसल्यामुळे मालाला उठाव नव्हता अशी दारुण अवस्था झाली होती. मग गुलोकन नावानेच चहाची टपरी सध्या चालवित आहे गुजराणी पुरते पैसे मिळतात असं म्हणत चहाबरोबर सिगरेटचे झुरके मारतांना महंमद रफीक बटची नजर पार शून्यात गेली होती. आता बस एकच आस उरलीयं काश्मीरमध्ये शांतता अमन- सूकून पुन्हा एकदा प्रस्थापित होईल, आणि एक ना एक दिवस माझी मुलं माझी जमिनीला परत येईल. होय... जमीला परत येणार आहे या एकाच आशेवर महंमद रफिक बट जगत होता.
0 Comments