नगर टुडे बुलेटिन

नगर टुडे बुलेटिन 

समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांचे मोलाचे योगदान - काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे 

वेब टीम नगर : महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा यांच्या विरुद्ध मोठा लढा उभारला होता. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.  महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने माळीवाड्यातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला हार करून काँग्रेस पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा समन्वयक ज्ञानदेव वाफारे, ज्येष्ठ नेते दीप चव्हाण, अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, डॉ.रिजवान शेख, डॉ.दिलीप बागल, सय्यद खलील, नलिनीताई गायकवाड, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष राजू भाई शेख, युवक काँग्रेसचे नगर तालुका अध्यक्ष अक्षय कुलट आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी विशाल कळमकर, प्रवीण गीते, प्रमोद अबुज, अमित भांड, अन्वर सय्यद, मुबिन शेख, यश भोंगे, जाहिद अखतार, शंकर आव्हाड, सिद्धू झेंडे, महेश लोंढे, संकेत लोकरे, मयुर सोनवणे, केतन खरपुडे, सागर बोराडे, गोपाल नायडू, आदित्य यादव, मनोज उंदरे, निसार बागवान राजू कुलकर्णी सौरभ रणदिवे, करण शेलार, मयूर सोनवणे, आदित्य यादव, महेश लोंढे, अमित मोमीन, अभिजीत कुलकर्णी आदीसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, विविध फ्रंटलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शालेय विद्यार्थ्यांनी घेतली व्हायोलिन मॅंटीस या आगळ्या वेगळ्या दुर्मिळ किटकाची नोंद

वेब टीम नगर:नगर तालुक्यातील वाकीवस्ती तसेच करंजी जवळील कोल्हेवाडी  परिसरात शालेय विद्यार्थी तन्वी अकोलकर,प्रियंका अकोलकर व शिवराम अकोलकर या विद्यार्थ्यांना खेळताना कचर्‍याची हालचाल होताना दिसुन आले.सुक्ष्म निरीक्षण केल्यावर तो कचरा नसुन जीव असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी अहमदनगर येथील जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक शिक्षक श्री.जयराम सातपुते यांच्याशी संपर्क केला.आपले वडिल सचिन अकोलकर यांच्यामार्फत सदर किटकाचे छायाचिञे व व्हिडीओ पाठवले.त्याची माहिती घेवुन त्यांच्या मार्गदर्शनाने त्याला त्वरीत निसर्गात मुक्तही केले

.हा मॅंटीस प्रजातीतील व्हायोलिन मॅंटिस नावाचा किटक असुन त्याची लांबी १२ते१५ सेमी असते. हा अतिशय दुर्मिळ असल्याची माहीती देत विद्यार्थ्यांच्या निरीक्षण शक्तीचे त्यांनी विशेष कौतुक केले.मॅंटिस प्रजातीतील किटक स्वरक्षणार्थ परिस्थितीशी मिळते जुळते घेवुन निसर्गाशी समरूप होण्यास अग्रेसर असतात.वाळलेल्या पानांप्रमाणे निसर्गाशी साम्य असलेल्या रूपामध्ये त्यांचे शरीर उत्क्रांत झालेले असते त्यामुळेच त्यांचे वास्तव्य सहजासहजी कोणाच्याही लक्षात येत नाही.कलाशिक्षक स्वदिप खराडे यांनीही अशाच आणखी एका किटकाची नोंद नुकतीच जेऊरजवळील वाकीवस्ती या ठिकाणी केली आहे.

भारत व श्रीलंका या देशांमधील काही भागात याचा विशेष नैसर्गिक अधिवास असतो.तसेच लहान असल्यापासुन प्रौढावस्थेपर्यंत तो अनेक वेगवेगळे रंग रूपे बदलतो.३० ते ४० अंश तापमान व आर्द्रता त्याच्या वाढीसाठी पोषक असते.त्याचे मुख्य अन्न इतर लहान किटक,माशा,फुलपाखरे असुन त्याचे शरीर व्हायोलिनच्या आकाराप्रमाणे दिसते.तापमानाच्या बाबतीत ही प्रजाती अतिसंवेदनशिल असल्याने तिचे प्रजनन कमी होते.यामुळेच निसर्गात या किटकांची संख्या अतिशय कमी असुन हे दुर्मिळ आहेत अशी माहिती जैवविविधता संशोधन व संवर्धन समुहाचे किटकअभ्यासक प्रतिम ढगे,अमित गायकवाड व सोमनाथ कुंभार यांनी दिली.

अहमदनगर जिल्ह्यात जैवविविधता संशोधन समुहातर्फे विविध विषयांवर निसर्गअभ्यास सहली काही वर्षांपासुन सातत्याने राबविल्या जात असुन त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये व नागरीकांमध्ये निसर्गाप्रती संशोधकता,संवेदनशिलता व जागृकता वाढत आहे.निसर्गातील अशा आगळ्या वेगळ्या गोष्टींच्या माहीतीची नोंद ते सातत्याने संस्थेकडे करत असल्याची माहीती निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांनी दिली.

-------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वसामान्यांसाठी झटणारे महात्मा फुले जनसेवक होते

 अनिल झोडगे : भिंगार अर्बन बँकेच्यावतीने अभिवादन 

    वेब टीम  नगर - फुले यांनी ’शिक्षण व समता’ या दोन शब्दातच त्यांच्या या कार्याचे यथोचित वर्णन करता येईल.  सर्वसामान्यांसाठी  झटणारे ते जनसेवक होते. भारतीय समाजातील   शूद्र, अतिशूद्र व स्त्रियांना गुलाम करणार्‍या व्यवस्थेविरुद्ध  जोतिबा फुले यांनी झुंज दिली. अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची मुहर्तमेढ रोवणार्‍या महात्मा फुले यांनी त्यावेळीच्या परिस्थितीवर मात करुन समाज सुधारण्याचे काम केले. त्यांच्या विचार जनसामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम आपणा सर्वांना करावयाचे आहे. सर्वसामान्यांच्या उन्नत्तीसाठी प्रत्येकाने कार्य केले पाहिजे. बँकेच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांना विविध माध्यमातून सहकार्य करुन त्यांच्या उन्नत्तीचे काम सुरु आहे, असे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे अध्यक्ष  अनिल झोडगे यांनी केले.

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त भिंगार अर्बन बँकेच्यावतीने बँकेच्या आवारातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अध्यक्ष अनिलराव झोडगे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी उपाध्यक्ष किसनराव चौधरी, संचालक नाथाजी राऊत, नामदेव लंगोटे, मुख्य कार्य.अधिकारी पांडूरंग हजारे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी उपाध्यक्ष यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंग सांगून त्यांच्या कार्याचा गौरव केला. तसेच बँकेच्यावतीने सुरु असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.

     कार्यक्रमास एकनाथ जाधव, विजय भंडारी, अमोल धाडगे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते. शेवटी पांडूरंग हजारे यांनी आभार मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारे खुले केली - बाळासाहेब बोराटे

    वेब टीम  नगर -  महिलांच्या शिक्षणाविषयी महात्मा फुले यांना तळमळ होती. त्यामुळेच त्यांनी पहिली मुलींची शाळा उघडली. महात्मा फुले यांच्या दुरदृष्टीनेच महिलांना शिक्षणाची दारे उघडी झाली. आणि त्यामुळेच आज महिला विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाने यशस्वी होत आहेत. त्यांचे खरे प्रेरणास्थान हे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रचाराबरोबरच महिलांच्या उन्नत्तीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे. त्यांचे विचार आपण आचारणात आणणे हीच खरी त्यांना आदरंजली ठरेल, असे प्रतिपादन  नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी केले.

     श्री संत सावता शिक्षण समितीच्या महात्मा फुले विद्या मंदिराच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक बाळासाहेब बोराटे,  पंडितराव खरपुडे, विष्णूपंत म्हस्के, मुख्याध्यापक संजय चौरे व शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.

     याप्रसंगी मुख्याध्यापक संजय चौरे म्हणाले, महात्मा फुले यांनी मुलींच्या शाळांबरोबरच अस्पृशांसाठी दोन शाळा उघडल्या अशाप्रकारे त्यांनी अनेक शाळा उघडल्या. त्या काळातील भारतातील शिक्षणविषयक प्रश्‍नासंबंधी चौकशी करुन सुधारणा सुचवण्यासाठी ब्रिटीश शासनाने हंटर यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ नेमले होते. तेच मंडळ पुढे भारतीय शिक्षण आयोग म्हणून देखील ओळखला जावू लागले.

     याप्रसंगी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ महात्मा फुले यांनी रोवली

 अभय आगरकर : ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर ट्रस्टच्यावतीने अभिवादन

वेब टीम नगर - महात्मा ज्योतिबा फुले यांनी  1848 साली पुण्यामध्ये भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठीही शाळा सुरु केली. त्यांच्या या कार्याला सतत विरोध होत असे. पण महात्मा फुले आपल्या भूमिकेवर ठाम होते. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. अशा महान व्यक्तीमत्वाचे स्मरण आपण नेहमी ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन श्रीविशाल देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले.

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिराच्यावतीने माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, हरिश्‍चंद्र गिरमे, चंद्रकांत फुलारी, नगरसेवक दत्ता कावरे आदि उपस्थित होते.

     याप्रसंगी अशोकराव कानडे म्हणाले, महात्मा फुले यांनी आपले आयुष्य हे समाजसेवेसाठी अर्पण केले. समाजातील दिनदुबळ्या, पिचलेल्या अशिक्षित समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून देऊन त्यांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतले. त्यामुळेच समाज जागृत होऊन शिक्षणाची क्रांती झाली. समाजातील परिवर्तनाची मोठी क्रांती त्यांनी केले. त्यांचे विचार आजही आपणास प्रेरणादायी आहेत, असे सांगितले.

     याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी महात्मा फुले यांना अभिवादन केले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुलेंनी समाजसेवेसाठी जीवन समर्पित केले 

 विक्रम राठोड : महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने अभिवादन

वेब टीम  नगर -महात्मा ज्योतीराव फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेने व स्वतःच्या प्रयत्नांनी घडविले होते. त्यांचा पिंड हा कृतीशील क्रांतिकारकाचा होता. महाराष्ट्राच्या समाजसेवेसाठी ध्येयाने भरून जाऊन आपले सर्व जीवन समर्पित करणारे ते थोर पुरुष होते. आधुनिक भारतातले पहिले समाज सुधारक म्हणून त्यांना ओळखले जाते. ते सामन्यातील असले तरी विचाराने व कर्तुत्वाने असामान्य होते. सामाजिक विषमतेविरुद्ध ज्योतीबांनी बंड पुकारुन समाज सुधारणेचे काम केले.  ते सर्वसामान्यांसाठी  झटणारे ते सेवक होते. हीच शिकवण शिवसेनेने अंगिकारली आहे, त्यामुळे समाज कार्याला शिवसेना प्राधान्य देते, असे प्रतिपादन युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांनी केले.

     महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिवसेनेच्यावतीने माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अनिल शिंदे, संजय शेंडगे, दत्ता कावरे, अमोल येवले, दत्ता जाधव,आशा निंबाळकर, अरुणा गोयल, गिरिष जाधव आदि उपस्थित होते.

     यावेळी  संभाजी कदम  म्हणाले, महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाजातील अनिष्ठ रुढी - परंपरा मोडित काढून समाज सुधारणेला प्राधान्य दिले. जो पर्यंत समाजामध्ये असलेल्या अज्ञानाचा नाश होत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही, ही त्यांची धारणा होते. त्यामुळेच त्यांनी शिक्षणाचे महत्व ओळखून समाज शिक्षित करण्याचे काम केले. अशा थोरव्यक्तीमत्वाने केलेल्या कार्यामुळेच समाजसुधारण्याचे काम झाले आहे, हेच कार्य आपणही पुढे सुरु ठेवले पाहिजे, असे सांगितले.

     याप्रसंगी दिलीप सातपुते, अनिल शिंदे आदिंनी आपले मनोगतातून महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे, संग्राम कोतकर, संतोष गेनप्पा, काका शेळके, परेश लोखंडे, शरद कोके, रमेश परतानी, अशोक दहिफळे, संदिप दातरंगे आदिंसह शिवसैनिक उपस्थित होते.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

अहमदनगर महाविद्यालयात संविधान दिन साजरा

वेब टीम  नगर - अहमदनगर महाविद्यालयातील गांधी अध्ययन केंद्र व राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘संविधान दिन’ मोठ्या उत्साहात प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस व गांधी अध्ययन केंद्राचे संचालक व राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुनील कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन साजरा करण्यात आला.

     संविधान दिनानिमित्त डॉ. सुनील कवडे यांनी ’भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेचे महत्त्व’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी उद्देश पत्रिकेचे महत्त्व व आजच्या काळात त्याची उपयुक्तता याविषयी सविस्तर विवेचन केले. भारतीय राज्यघटनेतील उद्देश पत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे, तो राज्यघटनेचा सार आहे. त्यामध्ये राज्यघटनेकडून जनतेच्या कोणत्या अपेक्षा पूर्ण करायच्या व राज्यकर्त्यांची वर्तणूक कशी असली पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन मिळते. उद्देश पत्रिकेमध्ये आपला देश सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य असला पाहिजे असे नमूद केले आहे. त्याच प्रमाणे न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्त्वांचा  स्वीकार केला पाहिजे. देशाचे एकता व एकात्मता अखंडीत राखण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. या बाबींवर त्यांनी विशेष भर दिला.

     या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुधीर वाडेकर यांनी केले तर आभार प्रा.विलास नाबदे यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. डी. बी. मोरे, डॉ. राजेंद्र टाक, प्रा. तुशीता अय्यर, राज्यशास्त्र विभागातील प्रा. फिरोज शेख,प्रा. पूनम घोडके व विद्यार्थी उपस्थित होते.

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे :शहर काँग्रेस

बाळासाहेब भुजबळ : प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घ्यावा 

    वेब टीम  नगर : आद्यसमाज सुधारक महात्मा ज्योतीराव फुले यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, यासाठी पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेऊन केंद्र सरकारला प्रस्ताव द्यावा. ना. थोरात यांना शहर काँग्रेसचे शिष्टमंडळ भेटणार आहे, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. म.फुले यांचा आज शनिवारी १३० वा स्मृतीदिनानिमित्त शहर काँग्रेसच्यावतीने आयोजित कार्यक्रमात सागर चाबुकस्वार यांनी महात्मा फुले यांना भारतरत्न द्यावा, असा ठराव मांडला. ठरावाला शहर उपाध्यक्ष शशिकांत पवार यांनी अनुमोदन दिले.

     सावित्रीबाई फुले यांचे प्राथमिक शिक्षण नगरच्या क्लेरा ब्रुस शाळेत झाल्याची माहिती अ‍ॅड.पिल्ले यांनी यावेळी दिली. या शाळेत सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

     भिंगार काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड.आर.आर.पिल्ले यांच्या अध्यक्षतेखाली या सोहळ्यात श्री.चाबुकस्वार आणि संतोष धीवर यांचे महात्मा फुले यांच्या जीवन कार्यावर व्याख्यान झाले. महात्मा फुले यांनी समाज परिवर्तन करुन समाजातल्या दीन-दुबळ्यांचे प्रतिनिधित्व केले. महात्मा फुलेंचे परिश्रम समाज प्रबोधनासाठी होते. त्यामुळे समाजात परिवर्तन झाले, असे वक्त्यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला.

     याप्रसंगी सुभाष रणदिवे, शशिकांत पवार, परवेझ झकेरिया, महिलाध्यक्ष मार्गारेट जाधव, एम.आय.शेख, मुकुंद लखापती, रजनी ताठे, रवी सूर्यवंशी, अ‍ॅड.नरेंद्र भिंगारदिवे आदि उपस्थित होते.

     कार्यक्रमात महात्मा फुले यांच्या जीवनावरील सुनिल महाजन यांनी केलेली कविता दिनेश येवले यांनी सादर केली. सूत्रसंचालन पत्रकार राजेश सटाणकर यांनी केले तर शेवटी आभार शामराव वाघस्कर यांनी मानले. यावेळी महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा निर्मला गायकवाड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

शिक्षणाची मशाल पेटवून महात्मा फुलेंनी सर्व समाजाला प्रकाशमान केले


आ.  संग्राम जगताप : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन

वेब टीम नगर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजय दिघे, महादेव कराळे, माजी नगरसेवक विष्णू म्हस्के, ओबीसी सेलचे अमित खामकर, युवती अध्यक्षा अंजली आव्हाड, उपाध्यक्षा सुजाता दिवटे, वकिल सेलचे अ‍ॅड. योगेश नेमाने, फुले ब्रिगेडचे दिपक खेडकर, मारुती पवार, जालिंदर बोरुडे, निलेश इंगळे, नितीन डागवाले, बन्सी खेतमाळीस, गणेश बोरुडे आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले की, रुढी, पंरपरेने बरबटलेल्या संस्कृतीत महात्मा फुलेंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे करुन दिली. शिक्षणाची मशाल पेटवून सर्व समाजाला प्रकाशमान केले. आज विविध क्षेत्रात महिला कर्तृत्व गाजवित असून याचे श्रेय महात्मा फुलेंना जाते. त्यांनी आपले आयुष्य दीन, दलित व बहुजन समाजाच्या कल्याणासाठी वाहिले. त्यांचे विचार आज समाजाला दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. प्रा. माणिक विधाते यांनी शिक्षणावर ठरावीक लोकांची मक्तेदारी त्यांनी मोडित काढून, महिलांसह सर्वांसाठी शिक्षणाचे दारे उघडे करुन दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला खर्‍या अर्थाने सुरुवात महात्मा फुले यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर त्यांनी केला असल्याचे सांगितले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुलेंना स्मृती दिनी अभिवादन

शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी

वेब टीम नगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या वतीने महात्मा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर शहरात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली. यावेळी यशस्विनीच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे पाटील, महिला बालविकास अधिकारी विजयामाला माने, समन्वयक रोहिणी पवार, आरती बडेकर, वैशाली नराल, रोहिणी वाघिरे आदी  उपस्थित होत्या.

रेखा जरे पाटील म्हणाल्या की, महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. शिक्षणाची दारे उघडी करुन, आजच्या युगात महिलांना सन्मान फुले दांम्पत्यांनी मिळवून दिला आहे. स्त्री शिक्षणाच्या चळवळीत कार्य करताना सावित्राबाईंच्या अनेक आठवणी नगरशी जोडल्या गेल्या आहेत. शहरात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यासाठी संघटनेने सातत्याने महापालिका प्रशासनाशी पाठपुरावा केला असून, या स्मारकाचा प्रश्‍न तातडीने मार्गी न लावल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देखील त्यांनी दिला.   

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घ्यावी -अ‍ॅड. भानुदास होले


भाजी मार्केटमध्ये मास्कचे वाटप करुन कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी जनजागृती

वेब टीम नगर: क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जीवन कार्यातून आजच्या युवकांनी प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज आहे. समाजातील विषमता नष्ट करून समानता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्यभर संघर्ष केला. समाजाला दिशा देऊन दीपस्तंभाचे कार्य महात्मा फुले यांनी केले असल्याची भावना जिल्हा माळी सेवा संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. भानुदास होले यांनी केले.  

जिल्हा माळी सेवा संघ, जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य, जय युवा अकॅडमी, आधार बहुउद्देशीय संस्था, रयत प्रतिष्ठान, उड्डाण फाऊंडेशन, रायझिंग युथ आदिवासी फाउंडेशन, नर्मदा फाउंडेशन, माहेर फाउंडेशन, उत्कर्ष बहुउद्देशीय संस्था, नेहरू युवा केंद्र अहमदनगर, कासा मनुष्यबळ संस्था, द युनिव्हर्सल फाऊंडेशन आदींच्या सहयोगाने महात्मा फुले यांचा स्मृतिदिन सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी अ‍ॅड. होले बोलत होते. शहराच्या गर्दीचे ठिकाण असलेले गाडगीळ पटांगण येथील भाजी मार्केटमध्ये कोरोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपविण्यासाठी जनजागृती करुन भाजी विक्रेते व बाजारात विना मास्क आलेल्या नागरिकांना मास्कचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अ‍ॅड. महेश शिंदे, अ‍ॅड. अनिता दिघे, अ‍ॅड. प्रणाली चव्हाण, आरती शिंदे, रजनी ताठे, नयना बनकर, डॉ. वैशाली गिर्‍हे, सागर आलचेट्टी, सिमोन बनकर, पोपट बनकर, मेजर नारायण चिपाडे, किरण सातपुते, सूर्यकांत रासकर, सुनील गायकवाड, अ‍ॅड.सुनिल महाराज तोडकर, रमेश चिपाडे, डॉ.संतोष गिर्‍हे, सी.आर. मिस्त्री, एन.एस. वनवे, आर.बी. शिंदे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. अनिता दिघे यांनी सामाजिक बांधिलकी जपत संस्थांनी कृतिशीलपणे सामाजिक उपक्रम राबवून महात्मा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्याचे आवाहन केले. तर कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी मास्क अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट केले. जय असोसिएशन ऑफ एनजीओ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अ‍ॅड. महेश शिंदे यांनी थोर समाजसुधारकांच्या कार्यातून संस्था प्रतिनिधींनी प्रेरणा घेऊन कार्य केल्यास निश्‍चित परिवर्तन होईल व समाजात क्रांती घडणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नेहरू युवा केंद्राचे तालुका समन्वयक गणेश ढोले यांनी केले. आभार अ‍ॅड. प्रणाली चव्हाण यांनी मानले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

महात्मा फुलेंचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते 

सुशांत म्हस्के : आरपीआयच्या वतीने महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी अभिवादन

वेब टीम नगर : विद्येचे सर्वश्रेष्ठ महत्त्व पटवून देणारे स्त्री स्वातंत्र्याच्या कल्पनांना साकाररूप देणारे महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला प्रकाशित केले. मुलींच्या शिक्षणाची सोय करून आजच्या स्त्रीला त्यांनी आदर स्थान मिळवून दिले आहे. फुले दांपत्यांनी दीनदलितांच्या उद्धारासाठी कार्य केले. सामाजिक रूढी, परंपरा व अंधश्रध्दा झुगारून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजात बदल घडवण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे महान कार्य एका समाजापुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी अखंड मानव जातीच्या उद्धारासाठी कार्य केले असल्याची भावना आरपीआयचे शहराध्यक्ष सुशांत म्हस्के यांनी व्यक्त केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त माळीवाडा येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष म्हस्के बोलत होते. याप्रसंगी आरपीआयचे कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, संतोष पाडळे, ऋषी विधाते, दिनेश पाडळे, सनी भिंगारदिवे, जमीर इनामदार आदि उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुलेंचा जयघोष करुन त्यांना अभिवादन केले. 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आत्मविश्‍वास वाढून भविष्यात प्रगतीसाठी अशा उपक्रमांची गरज

आमदार संग्राम जगताप : रोजगार मिळण्यासाठी पिठाच्या गिरण्यांचे वाटप

वेब टीम नगर : गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भामुळे आरोग्याबरोबरच अनेक रोजगाराच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यात प्रमुख्याने अनेकांचा रोजगार बुडाला तर नोकर्‍या देखील गेल्या आहेत. त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत युवक, महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ५० टक्के सवलतीच्या दरात पिठाच्या गिरण्या देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे काम करण्यात आल्याची भावना आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ५० टक्के सवलतीच्या दरात कोरियन कंपनीच्या पिठाच्या गिरण्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जगताप बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, महिला अध्यक्षा रेशमा आठरे, ओबीसी सेलचे अमित खामकर, अंजली आव्हाड, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, बाळासाहेब जगताप, रमेश शिंदे, महादेव कराळे, गणेश बोरुडे, मनिष फुलडहाळे, अ‍ॅड. योगेश नेमाणे, अनिकेत कोळपकर, संतोष चौधरी, बंटी पोकळे, दिपक खेडकर आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे आमदार जगताप म्हणाले की, या रोजगार निर्मितीच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण होणार आहे. विशेषत: महिलांसाठी हा उपक्रम फायदेशीर असून, त्यामुळे कुटूंबाला आर्थिक हातभार लागण्यास मदत होणार आहे. अशा योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. नागरिकांनीही अशा योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. तर प्रत्येकाला नोकरी लागणे शक्य नाही, अशा परिस्थिती छोट-मोठ्या व्यवसाय करुन प्रगती करणे क्रमप्राप्त आहे. यासाठी शासनाच्यावतीनेही विविध योजना राबविण्यात येत आहे. कोरोना काळातही गरजूंना मदतीचा मोठा हात देऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आधार देण्याचे काम केले आहे. असेच काम यापुढेही सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  

याप्रसंगी प्रा.माणिकराव विधाते, रेश्मा आठरे आदिंनी मार्गदर्शन करुन शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तसेच कंपनीही या मशिनबाबत वॉरंटी, सर्व्हीस सेंटर सुरु करावे अशा सूचना केल्या. प्रास्तविकात संतोष ढाकणे या उपक्रमाचे वैशिष्ट्ये सांगितले. आभार वैभव ढाकणे यांनी मानले. राष्ट्रवादी विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व उपाध्यक्ष संतोष ढाकणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

साखर कामगारांचा राज्यव्यापी बेमुदत संप मागे

पगार वाढीसाठी त्रिपक्षीय समिती स्थापनेच्या राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत

वेब टीम नगर: राज्य सरकारने राज्यातील साखर कामगारांच्या पगार वाढीचा निर्णय घेणार्‍या त्रिपक्षीय समितीची घोषणा करून, साखर कामगारांच्या विविध प्रश्‍नावर चर्चा करण्याची तयारी दर्शविली आहे. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघाच्या वतीने सोमवार दि.३० नोव्हेंबर पासून घोषणा केलेल्या राज्यव्यापी बेमुदत संप मागे घेण्यात आला असल्याची माहिती प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, सरचिटणीस शंकरराव भोसले, महासंघाचे सहसचिव आनंदराव वायकर यांनी पुणे येथे पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी

राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीसह इतर प्रश्‍न प्रलंबीत असल्याने संघटनेने बेमुदत संपाचा इशारा दिला होता. राज्य सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या सहकार व कामगार खात्याने राज्यातील साखर कामगारांच्या पगारवाढीचा निर्णय घेण्यासाठी १९ महिने प्रलंबित असलेली त्रिपक्षीय समिती गठित केली आहे. या सरकारच्या निर्णयाचे संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगार यांच्या वेतनवाढीच्या त्रिपक्षीय समितीच्या कराराची मुदत ३१मार्च २०१९ रोजी संपलेली होती. दोन्ही संघटनांनी समिती गठीत करण्याची नोटीस तसेच विविध मागण्यांचा मसुदा सरकार व संबंधितांना फेब्रुवारी २०१९ मध्ये दिला होता. त्यानंतर आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री सहकार मंत्री कामगार मंत्री व साखर संघाच्या अध्यक्षांना सातत्याने पत्रे दिलेली होती. मात्र फारशा हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे २० ऑगस्ट २०१९ रोजी राज्यातील ५० हजार साखर कामगारांचा पुणे येथील साखर आयुक्तांच्या कार्यालयावर इशारा मोर्चा नेला होता. राज्यात सत्तापरिवर्तन झाल्यानंतर नव्या महाविकास आघाडीचे सहकारमंत्री यांच्यापुढे सदर प्रश्‍न मांडण्यात आला.  दरम्यान अवकाळी पावसाचा संकट राज्यावर आले होते. तेही साखर कामगारांनी समजून घेतले. या सरकारनेही त्रिपक्षीय समिती गठित करणे व साखर कामगारांचे प्रश्‍न सोडविण्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले नसल्याने नाईलाजाने सांगली येथील ६ नोव्हेंबर रोजी प्रतिनिधी मंडळाच्या जनरल कौन्सिलचे बैठकीमध्ये राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय घेण्यात आला होता.

या घोषणेनंतर राज्य सरकारने १२ नोव्हेंबर रोजी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखाना प्रतिनिधी कामगार संघटनेचे प्रतिनिधी तसेच साखर आयुक्त व कामगार आयुक्त अशी एकूण साधारण ३१ सदस्यांची त्रिपक्षीय समिती गठित केली आहे. या समितीचे सचिव रविराज  इळवे आहेत. या सरकारने साखर कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी चर्चा करण्याची भूमिकाही घेतली असल्याने सरकारच्या भूमिकेचे स्वागत करून हा संप मागे घेत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. यावेळी प्रतिनिधी मंडळाचे कार्याध्यक्ष अविनाश आपटे, राऊसाहेब पाटील, रावसाहेब भोसले, महासंघाचे अध्यक्ष पी.के. मुडे, सरचिटणीस सुभाष काकुस्ते, खजिनदार व्ही.एम. पतंगराव, कार्याध्यक्ष शिवाजीराव औटी, उपाध्यक्ष शिवाजी कोठवळ, बी.जी. काटे, सहचिटणीस सत्यवान शिखरे, रामदास राहणे, भाऊसाहेब ऐखंडे, बापुराव नागवडे, शरद नेहे, व्दारकादास दिलवाले, युवराज रणवरे, डी.बी. मोहिते, अशोक बिराजदार, नितीन बेनकर, सचिव राजेंद्र तावरे, सयाजी कदम, प्रदीप शिंदे, कैलास कावळे, संजय मोरबाळे, तसेच आदि उपस्थित होते. 

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------




Post a Comment

0 Comments