"अमृत"चे काम मार्चअखेर पूर्ण करा : सभापती मनोज कोतकर

"अमृत"चे काम मार्चअखेर पूर्ण करा : सभापती मनोज कोतकर  

वेब टीम नगर :  नगर शहरात पाण्याची अडचण निर्माण होतेय म्हणून अमृत पाणी योजनेची मुळा धरणापासून विवाद पंपिंग स्टेशन पर्यंत ची पाहणी करून  पाणी पुरवठा विभागाची तातडीची बैठक घेऊन या योजनेला गती देऊन मार्च अखेर पर्यंत ती पूर्णत्वास नेण्याचे आदेश  स्थायी समितीचे सभापती मनोज कोतकर यांनी दिले .अमृत पाणी योजनेची ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याचा ठपकाही या बैठकीत ठेवण्यात आला. 

     स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांनी घेतलेल्या अमृत पाणी योजनेच्या बैठकित पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर.जी.सातपुते, सोनन इंजिनिअरींग चे संचालक पानसे, अभियंता गणेश गाडळकर, पीएमसीचे मुळे आदी उपस्थित होते. यावेळी दुसर्‍यांदा शेतकर्‍यांची पिकांचे पंचनामे करून त्यांना धनादेश द्यावा व त्यांच्या शेतातून लवकरात लवकर पाईप टाकण्याचे काम सुरू करावे. तसेच वनविभागाच्या जागेतून पाईप लाईन जात आहे. जिल्हा वन अधिकारी रेड्डी यांची भेट घेवून परवानगी घ्यावी. मुळा धरण येथील पंपींग स्टेशनचे काम मार्गी लावावे यासाठी प्रशासनाने जलदगतीने कामाला सुरूवात करावी असा आदेश या बैठकीत देण्यात आले. 

Post a Comment

0 Comments