सामाजिक कार्यकर्ते डोंगरे यांनी घेतली पद्मश्री राहिबाई पोपेरे यांची भेट
वेब टीम नगर : पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांनी पद्मश्री राहिबाई पोपेरे यांची भेट घेऊन त्यांच्या बीज बँकेची माहिती घेतली. अकोले तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे येथे जाऊन डोंगरे यांनी पोपेरे यांच्या १५४ पिकांच्या शेकडो पारंपारिक बियाणांच्या वाणाची माहिती घेऊन त्याचे नगर तालुक्यात रोपण करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी हरियाली संस्थेचे सुरेश खामकर, सुकेश सदगीर, सोमा पोपेरे उपस्थित होते.
पद्मश्री राहिबाई पोपेरे यांनी बीज बँक उभारुन अनेक गावरान बियाणांचे संवर्धन केले आहे. विषमुक्त सेंद्रीयशेतीकडे युवकांना वळण्यासाठी त्यांचा पुढाकार आहे. शेतकरी पुन्हा सेंद्रीय शेतीकडे वळाल्यास त्याच्या मालाला चांगला भाव मिळून चांगले दिवस येणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पै. नाना डोंगरे यांनी डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मागील वीस वर्षापासून वृक्षरोपण व संवर्धन, जलसंधारण, प्रदूषणमुक्तीसाठी सामाजिक उपक्रम राबवित असल्याची माहिती दिली. पोपरे यांनी डोंगरे यांना बियाणांचे वाण दिले. डोंगरे यांनी दिलेले वाण शेतात लावण्याचा मानस व्यक्त केला.
0 Comments