सलमान खानची झाली कोविड टेस्ट

 सलमान खानची झाली  कोविड टेस्ट 

सलमान खानची कोविड - १९ ची टेस्ट निगेटिव्ह आली असून तो या आठवड्यात बिग बॉसच्या चित्रीकरणातही सहभागी होणार असल्याचे समजते. सलमान खानचाड्रायव्हर अशोक आणि त्याच्या दोन स्वयंपाकींची कोविड -१९ पॉझिटिव्ह चाचणी झाली होती. अर्थात त्यामुळे अभिनेता सलमान  आणि त्याचे कुटुंब यांनाहीलागण झाल्याची शक्यता होती त्यामुळे ही कोविड टेस्ट करण्यात आली . 

 अभिनेता सलमान आणि त्याच्या कुटूंबाशी संपर्क साधला असता कोविड  चाचणी नकारात्मक  आल्याच्या वृत्ताला  पुष्टी दिली. फक्त सलमान खानच नाही तर स्टाफच्या सदस्यांशी त्यांचा थेट संपर्क नसल्यामुळे त्याच्या संपूर्ण कुटुंबाचीही चाचणी नकारात्मक आली आहे.  एका सूत्रानुसार  “अत्यंत सौम्य लक्षणे असणाऱ्या  कर्मचार्‍यांना शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराची काळजी सलमान घेत आहे.  ड्रायव्हर किंवा त्याच्या कुकपैकी कोणाशीही सलमानचा थेट संपर्क नसल्याचेही या सूत्राचे म्हणणे आहे. ,गेल्या सात दिवसांपासून त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून आली  नाहीत म्हणूनच आज बिग बॉसच्या शूटसाठी सर्वजण तयार झाले आहेत. ”

सलमान खान रिऍलिटी शोच्या  भागांसाठी शूट करणार आहे आणि तो क्रू मेंबर्सशी जास्त संपर्क साधणार नाही.   क्रूचे सदस्यही  शोच्या सुरळीत प्रवासासाठी  सावध पावले उचलत आहेत. दरम्यान सलमान खानचा एक सिनेमा-शूटही होणार आहे,  त्याचा मेहुणा आयुष शर्मा सोबत  बनवणार आहे. हा चित्रपट मुळशी पॅटर्नचा रिमेकअसून 'अंतिम ' नावाच्या  मराठी  चित्रपटात सलमान खान एक कॉप साकारत आहे. या चित्रपटाचे शूटिंग वर्षाच्या अखेरीस पूर्ण होईल  आणि पुढच्या वर्षाच्या सुरूवातीस तो टायगर ३  साठी शूटिंग सुरू करेल.

Post a Comment

0 Comments