मंदिरे उघडण्यात आल्याने विश्व हिंदू परिषदेतर्फे महाआरती
वेब टीम नगर-कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मंदिरे २४२ दिवस बंद होती.मंदिरे सरकारने खुली करावीत.या मागणीसाठी नगर जिल्हा विश्वहिंदू परिषदे तर्फे जिल्हाधिकारी,मुख्यमंत्री यांना विश्वहिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री विवेक कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले होते.तसेच विश्वहिंदू परिषदेचे क्षेत्रीय मंत्री शन्करजी गायकर यांच्या हस्ते राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही निवेदन देण्यात आले होते.मागील महिन्यात माळीवाडा येथील विशाल गणेश मंदिराच्या दारासमोर सरकारने मंदिरे उघडावी या मागणीसाठी आंदोलन ही करण्यात आले होते.राज्य सरकारने परवानगी दिल्याने सोसिअल डिस्टन्स चे सर्व नियम पाळून दिवाळी पाडव्याच्या दिवशी देवालय भक्तांच्या दर्शनासाठी मंदिरे उघडण्यात आल्याने दिल्लीगेट येथील कुबेर गणेश मंदिरात विश्व हिंदू परिषदेतर्फे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे,कार्याध्यक्ष अँड.जय भोसले,मठ मंदिर संपर्क समितीचे जिल्हा प्रमुख हरिभाऊ डोळसे,ह.भ.प.शिवाजी महाराज जाधव,प्रांत धर्म प्रसार सह प्रमुख मिलिंद मोभारकर,मुकुल गंधे,इंजिनिअर विनोद काकडे,खरपुडे,निलेश चिपाडे,बाली जोशी,प्रखण्ड मंत्री अनिल राऊत,महेश देशमुख आदी उपस्थित होते.
0 Comments