पंधरा वर्षे वयाची श्‍वेता भावंडासाठी निभावणार आईची भूमिका

पंधरा वर्षे वयाची श्‍वेता भावंडासाठी

निभावणार आईची भूमिका

शिक्षक फुंदे दाम्पत्याचा पुढाकार

 वेब टीम नगर : दोन वर्षापुर्वी आईचं निधनान  पाचही लेकरं पोरकी झाली आईच्या दुःखाच्या जखमा ओल्या असतांनाच आठ महिन्यापुर्वी वडिलांनी आयुष्य संपवल.  दगडवाडी येथील शिंदे कुटुंबावर आभाळ फाटल्यागत दुःखाचा डोंगर कोसळला अन नव्वदीच्या घरात असलेल्या आजी-आजोबावर नातवंडांच्या संगोपनाच्या जबाबदारीने मरता येईना म्हणून जगायची वेळ आली.

     वंचितांसाठी काम करणार्‍या गुरुकुल तथा सेवाश्रय फाऊंडेशनच्या अध्यक्षा अनुराधा व पोपटराव फुंदे या शिक्षक दाम्पत्यांना ही भयंकर हकीकत समजली. त्यांनी लगेच दगडवाडी गाठली तिथ गेल्यानंतर परिस्थिती खूपच विदारक दिसली होती.

     सर्वात मोठी श्‍वेता दहावीत शिकतेय अन शेवटच भावंड दोन वर्षाचं! अशी परिस्थिती पाहता त्या पाचही लेकरांच शैक्षणिक पालकत्व फुंदे दाम्पत्याने स्विकारत आजी-आजोबांना जगण्याचा आधार देत श्‍वेताच्या पायात बळ निर्माण करण्याचा दाम्पत्याने निर्धार केला. लता मंगेशकर यांच उदाहरण देत श्‍वेता तुच आता या भावंडांची आई हो आम्ही पाठीशी आहोत म्हणत घर चालवण्यासाठी उदरनिर्वाहाच साधन म्हणून श्‍वेताला शिवण क्लास लावून तिला शिलाई मशीन देण्याचा शब्द फुंदे दाम्पत्याने दिला. श्‍वेतान क्लास पूर्ण केला त्यानुसार आज संपूर्ण कुटुंबाला नवीन कपडे भेट देत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फुंदे यांनी श्‍वेताला शिलाई मशीन भेट दिली.

     दुःखीतांचे अश्रू पुसत काहीअंशी अशीच व्यथा असलेल्या आणखी दोन कुटुंबांसोबत फुंदे दाम्पत्याने साजरी केलेल्या दिवाळीच सर्वत्र कोतुक होत आहे. प्रसंगी गुरुकुल मंडळाचे शिक्षक नेते आसाराम शिंदे रविंद्र शिंदे, अनिल शिंदे, महादेव शिंदे काळे आदि उपस्थित होते.

     श्‍वेताने जिद्दीने भावंडासाठी आईची भूमिका निभावण्याची दाखवलेली तयारी आणि फुंदे दाम्पत्याच दातृत्व निश्‍चितच समाजातील अनेक पिडीत दुःखीतांना जगण्यास उभारी देण्यास प्रेरणादायी ठरेल.

Post a Comment

0 Comments