दिवाळी विशेष : फरक

दिवाळी विशेष 

फरक 


आज हि ती रांधतेच आहे 

वाढतेच आहे 

फरक इतकाच झाला की 

चूल गेली गॅस आला 

घरापासून ऑफिसपर्यंत

तिचा मार्ग मोकळा झाला 

ती चालतेच आहे 

हक्कासाठी लढतेच आहे 

फरक इतकाच झाला की 

समानतेचे भान आले 

सभोवती तिच्या मात्र 

असुरक्षिततेचे तण वाढले 


ती गर्भातच मरते आहे 

हुंड्यासाठी जळते आहे 

अत्याचारित होते आहे 

कोवळ्या कळ्यांच्या 

आर्त किंकाळ्यात 

उघड्या डोळ्यांनी बघणार्या समाजात 

सांगा खरंच ती स्वतंत्र आहे ? 

सांगा खरंच ती स्वतंत्र आहे ?


- सुरेखा घोलप 

Post a Comment

0 Comments