दिवाळी विशेष :
सय दाटली मनात
सय दाटली मनात
सांज न्हाली केसरात
आली लपेटुन धुक्याची
मऊ गुलाबी ही थंडी
चाहुल लागता तुझी
साय दाटते मायेची
रिते आभाळ व्हावे
नभ फिरुन दाटावे
या उनाड वार्यास
कुणीतरी अडवावे
सय दाटता सख्याची
आस चिंब भिजण्याची
उधळते चांदणे नभी
आठवता तुझी छबी
मी चंद्राची चांदणी
तु चांद नभी दडला
जीव चांदणीचा शिणला
चंद्राला नाही कळला
संगीता
0 Comments