"त्या" २०० शाळांचे रखडलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या पहिल्या टप्प्याचे देयक मंजूर
वेब टीम नगर - सातव्या वेतन आयोगातील पहिल्या टप्प्याचे रखडलेली २०० शाळांची वेतन फरक देयके मंजूर करण्यात आली असून, दिवाळीनंतर शिक्षक-शिक्षकेतरांना खात्यात जमा होतील, अशी माहिती वेतन पथकातील मुख्य लिपिक श्रीमती माधुरी भंडारी यांनी अहमदनगर महानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघास दिली.
दि.५ नोव्हेंबर रोजी जिल्हा माध्य. शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांचे निवेदनाद्वारे शिक्षक संघटनेने लक्ष वेधले होते. त्यांच्या प्रती शालेय शिक्षणमंत्री शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक यांना पाठविण्यात आल्या होत्या.
मे. २०२० मध्ये ७ व्या वेतन आयोग पहिला टप्प्यातील फरक देण्यात नगर शहर, नगर तालुका, श्रीरामपूर तालुका, कर्जत तालुका आदि २०० शाळा निधी अभावी मागे ठेवण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या तालुक्यात सध्याच्या विधानसभा सदस्यांच्या शिक्षण संस्था नाहीत. इतर सर्व तालुक्यांना पहिला हप्त मे मध्येच अदा केलेला होता.
नियमित शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधी, पेन्शनर्स व डीसीपीएस धारकांच्या सॅलरी खात्यात ही रक्कम दिवाळीनंतर जमा होईल, असेही श्रीमती भंडारी यांनी सांगितले. दुसर्या व तिसर्या टप्प्याची देयके जुलै. २०२१ मध्ये देण्याचे शासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे.
७ वा वेतन आयोग पहिला हप्ता दिवाळीपूर्व मिळावा याचा पाठपुरावा अ.नगर शहर माध्य. शिक्षक संघाचे अध्यक्ष उद्धव गुंड, ज्येष्ठ मार्गदर्शक रमेश वहाब, प्रभाकर खणकर, रोहिदास कांबळे आदिंनी केला होता. प्रभारी माध्य. शिक्षणाधिकारी रामदास हराळ, उपशिक्षणाकारी, शिवाजी शिंदे, कक्ष अधिकारी सुभाष कराळे, अधिक्षक मच्छिंद्र यांनी शिक्षक संघटनेने धन्यवाद दिले आहेत.
0 Comments