अ.भा.महात्मा फुले समता परिषदेच्या अध्यक्षपदी दत्ता जाधव
वेब टीम नगर - अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची मुंबई येथे नुकतीच राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होती. यामध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन समता परिषदेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी अहमदनगर महानगर अध्यक्षपदी दत्ता जाधव यांची फेरनिवड करण्यात आली. या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ यांच्याहस्ते देण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष बापू भुजबळ उपस्थित होेते.
याप्रसंगी ना.छगनराव भुजबळ म्हणाले, समता परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर विविध उपक्रमातून समाज जोडण्याचे काम सुरु आहे. या उपक्रमात समाजातील विविध स्तरातील महिला, युवक मोठ्या संख्येने जोडले जात आहे. नगर जिल्ह्यात समता परिषदेचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असून, पदाधिकारी राबवित असलेल्या उपक्रमांचा समाजातील विविध घटकांना फायदा होत आहे. फेर निवड झालेले दत्ता जाधव यांनीही समता परिषदेच्या कार्यात चांगले योगदान दिले आहे, त्यांचे कार्य यापुढेही असेच सुरु ठेवून समता परिषदेचे कार्य वाढवावे असे आवाहन ना.भुजबळ यांनी केले.
नियुक्तीनंतर दत्ता जाधव म्हणाले, समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ना.छगनराव भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे नगरमध्ये चांगले काम सुरु आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, शैक्षणिक अडचणी सोडविल्या. त्याचबरोबर महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी कार्य सुरु आहे. महात्मा ज्योतीबा व सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न मिळावा तसेच फुले वाड्याचे स्मारकात रुपांतर करावे, यासाठी आंदोलनेही केली आहेत. आज फेर निवड करुन माझ्या कार्याची पावतीच मला मिळाली, असे सांगून यापुढे समता परिषदेचे काम आणखी जोमाने करु, असे सांगितले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस अंबादास गारुडकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, पश्चिम विभागीय अध्यक्ष मच्छिंद्र गुलदगड, उत्तर जिल्हाध्यक्ष प्रशांत शिंदे आदि उपस्थित होते.
0 Comments