भारत रसातळाला जाण्यापासून वाचवा
ॲड.कॉ. बन्सी सातपुते : मोदी सरकारचे नवे कायदे शेतकरीविरोधी
वेब टीम नगर - देेशातील सत्तेवर असलेल्या हुकुमशाही मोदी सरकारने देशभरातील शेतकरी, कामगार व सर्वसामान्य जनतेच्या हिताविरूध्द वर्तणुक सुरू केलेली असुन नुकतेच पाशवी बहुमताच्या जोरावर शेतकरीविरोधी असलेले कायदे मंजुर केले आहेत. हे नवे कायदे शेतकरी, कामगार व सर्वसामान्य माणसाच्या विरोधातील असुन भांडवलदार धार्जिणे आहेत. असे देशविरोधी कायदे जनतेने नाकारले पाहिजेत असे प्रतिपादन ॲड.कॉ.बन्सी सातपुते यांनी केले.
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार अहमदनगरमधील मार्केटयार्ड येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर अखिल भारतीय किसान सभा व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने निदर्शने व चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. केन्द्र सरकारने देशातील जनतेच्या विरोधातील केलेले कायदे त्वरीत रद्द करावेत यासाठी आता जनतेने येत्या काळात रस्त्यावर उतरण्याचे आवाहन त्यांनी केले.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास विकास गेरंगे आणि सतीश निमसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्य जनता आंदोलनात सहभागी झाली होती. यावेळी मोदी सरकारच्या शेतकरी, कामगार व सामान्य जनताविरोधी धोरणाचा घेषणा देत धिक्कार करण्यात आला.
आंदोलकांस सिटु संघटना जिल्हाध्यक्ष कॉ.प्रा.डॉ. महेबुब सय्यद, कामगार नेते महादेव पालवे आणि शेतकरी नेते विकास गेरंगे आदींनी मार्गदर्शन केले.
आंदोलनाचे सुत्र संचालन कॉम्रेड भैरवनाथ वाकळे यांनी केले तर आभार कॉ.कार्तिक पासलकर यांनी मानले. आंदोलन यशस्वी करण्यासाठी तुषार सोनवणे, अमोल पळसकर, दत्ता जाधव, राहुल कराळे, गणेश माने आदींनी परिश्रम घेतले.
0 Comments