आरोग्य आहार

आरोग्य आहार 

दलिया मूग उत्तपा 

साहित्य : १/२ वाटी दलिया , १ वाटी मोड आलेले मूग , आले लसूण हिरवी मिरची पेस्ट , लाल- हिरवी- पिवळी ढोबळी मिरची , टोफू , चीज , मीठ , स्वीट कॉर्न. 

कृती: प्रथम दलिया शिजवून घेणे. मोड आलेले मूग व शिजवलेला दलिया वेगवेगळे मिक्सरवर बारीक करून घेणे. त्यामध्ये आले लसूण हिरवी मिरची पेस्ट , मीठ टाकून मिश्रण एकसारखे करणे.


तिन्ही रंगाच्या सिमला मिरची बारीक चिरणे. टोफूचे बारीक तुकडे करणे, स्वीट कॉर्न वाफवून घेणे. 

तयार केलेल्या पिठाचे छोटे पुरी एवढे उत्तपे तेल लावलेल्या तव्यावर टाकणे , त्यावर लगेचच तिन्ही सिमला मिरची , टोफूचे तुकडे , स्वीट कॉर्न पसरवणे व वरून चीज किसून टाकणे . झाकण ठेवून भाजणे . 

दिसायला व चवीला पिझ्झा सारखे लागते . दलिया व हिरव्या मुगामुळे पदार्थ  अधिकच पौष्टिक होतो. 

टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करणे. 

अनुपमा वैभव जोशी - 9404318875

Dietition and Nutrition  

* B.Sc. in Food Science and Nutrition 

*Diploma in Nutrition and Health Education 

*Diploma in Yog Shikshak



Post a Comment

0 Comments